Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > तासगावमध्ये नवीन बेदाणा सौद्यांना सुरवात; वाचा हिरव्या व पिवळ्या बेदाण्याला काय मिळतोय दर?

तासगावमध्ये नवीन बेदाणा सौद्यांना सुरवात; वाचा हिरव्या व पिवळ्या बेदाण्याला काय मिळतोय दर?

New raisins deals begin in Tasgaon; Read what price is being paid for green and yellow raisins? | तासगावमध्ये नवीन बेदाणा सौद्यांना सुरवात; वाचा हिरव्या व पिवळ्या बेदाण्याला काय मिळतोय दर?

तासगावमध्ये नवीन बेदाणा सौद्यांना सुरवात; वाचा हिरव्या व पिवळ्या बेदाण्याला काय मिळतोय दर?

bedana market tasgaon तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नवीन बेदाणा हंगामाचा आणि सौद्यांचा जल्लोषात शुभारंभ झाला.

bedana market tasgaon तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नवीन बेदाणा हंगामाचा आणि सौद्यांचा जल्लोषात शुभारंभ झाला.

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नवीन बेदाणा हंगामाचा आणि सौद्यांचा जल्लोषात शुभारंभ झाला.

सकाळी अकरा वाजता सेलहॉलमध्ये झालेल्या औपचारिक उद्घाटनानंतर बाजारात नव्या बेदाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली.

पहिल्याच दिवशी १८ आडत व्यापाऱ्यांकडे एकूण १३० टनांची आवक झाली. हिरव्या बेदाण्याला ३३० ते ४११ रुपये तर पिवळ्या बेदाण्याला ३२५ ते ३८७ रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

हंगामाच्या पहिल्याच दिवशीचा भूपाल पाटील यांच्या धारेश्वर ट्रेडिंग कंपनीत सोन्याळ (ता. जत) येथील शेतकरी अनिल बिराजदार यांच्या ४१ बॉक्स बेदाण्याला प्रतिकिलो ४११ रुपये एवढा सर्वोच्च दर मिळाला.

नवीन बेदाणा हंगामाचा श्रीगणेशा बाजार समितीचे सभापती युवराज पाटील, उपसभापती रामचंद्र जाधव, संचालक धनाजी पाटील, व्यापारी संचालक सुदाम माळी यांच्या हस्ते झाला.

महाराष्ट्रासह कर्नाटक आणि अन्य राज्यांतील खरेदीदार व्यापारी तसेच तासगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर बाजारात दिवसभर खरेदी-विक्रीचा उत्साही माहोल कायम राहिला होता.

शेतकऱ्यांच्या बेदाण्याला योग्य आणि स्पर्धात्मक दर मिळावा यासाठी त्यांनी आपला माल थेट तासगाव बाजार आवारातच विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती पाटील यांनी केले.

अधिक वाचा: महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीला जागतिक ओळख मिळवून देणारा अवलिया शेतकरी 'किसन भिलारे'

Web Title : तासगाँव में किशमिश बाजार खुला; हरे और पीले किशमिश के दाम सामने आए।

Web Summary : तासगाँव के कृषि बाजार में किशमिश के मौसम की शानदार शुरुआत हुई। हरे किशमिश ₹330-411/किग्रा, पीले ₹325-387/किग्रा बिका। अनिल बिराजदार को ₹411/किग्रा मिला। अधिकारियों ने किसानों को सीधे बेचने के लिए प्रोत्साहित किया।

Web Title : Tasgaon raisin market opens; prices for green and yellow raisins revealed.

Web Summary : Tasgaon's agricultural market saw a vibrant start to the raisin season. Green raisins fetched ₹330-411/kg, yellow ₹325-387/kg. 130 tons arrived, with Anil Birajdar receiving ₹411/kg for his raisins. Officials encourage farmers to sell directly for competitive prices.