lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली

Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली

Muhurta of Akshaya Tritiya; Demand for mangoes has increased in the market | Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली

Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली

अक्षय्य तृतीया या दिवशी आंब्याचे पूजन करून त्याचे सेवन करण्याची प्रथा आहे. फळबाजारात दक्षिणेकडील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कोकणातून हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

अक्षय्य तृतीया या दिवशी आंब्याचे पूजन करून त्याचे सेवन करण्याची प्रथा आहे. फळबाजारात दक्षिणेकडील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कोकणातून हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अक्षय्य तृतीया या दिवशी आंब्याचे पूजन करून त्याचे सेवन करण्याची प्रथा आहे. फळबाजारात दक्षिणेकडील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कोकणातून हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याची मागणी वाढल्याने सध्या शहरामध्ये रस्त्या-रस्त्यावर, गल्ली-बोळांमध्ये आंब्याची विक्री सुरू आहे. आवक वाढल्याने शहरातील कृषी उत्त्पन्न बाजार समिती, लक्ष्मी मार्केट, कस्तुरबा मार्केट, विजापूर रोड बाजारात आंब्यांचा चांगलाच सुगंध दरवळत आहे.

देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याचे दर प्रति डझन चारशे ते सहाशे रुपयांच्या दरम्यान आहेत. कोकणातील हापूस आंब्याच्या तुलनेत स्थानिक केशर, लालबाग, पायरी, बदाम आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, इतके असल्याने त्यांची विक्री होत असल्याने खवय्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

एक ते दोन डझनच्या खोक्यांना पसंती
आंब्याच्या पेटीपेक्षा ग्राहकांकडून एक ते दोन डझनच्या आंब्याच्या खोक्यांना मागणी आहे, यंदाच्या हंगामातील ही उच्चांकी आवक आहे. अक्षय्य तृतीयेमुळे आंब्यांना चांगली मागणी असल्याचे आंबा व्यापाऱ्यांनी सांगितले.

हापूसचा भाव उतरला
सध्या बाजारात रत्नागिरी, देवगड तसेच कर्नाटक, हैदराबाद येथून हापूस आंबा विक्रीला येत आहे. अस्सल खवय्येच रत्नागिरी व देवगडचे आंबे ओळखू शकतात. अक्षय्य तृतीयेमुळे हापूसला मागणी वाढली आहे. आंब्याचे भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. पुढील दोन-तीन दिवसात आंब्यांना आणखी मागणी वाढेल.

रत्नागिरी अन् कर्नाटक हापूस दिसायला सारखेच
विक्रेत्यांकडून रत्नागिरी हापूस असल्याचे सांगून कर्नाटक हापूसची विक्री केली जाते. रत्नागिरी आणि कर्नाटक हापूस दिसायला सारखेच असल्याने व्यापाऱ्यांकडून फायदा घेतला जात आहे. परंतु, दोन्ही आंब्यांच्या चवीमध्ये खूपच फरक आहे. रत्नागिरी आंबा अधिक मधूर असून, त्या तुलनेत कर्नाटक हापूसची चव नसते. पूर्ण पिकल्यानंतर रत्नागिरी देवगड हापूस आंब्यांना विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो.

अधिक वाचा: Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक

Web Title: Muhurta of Akshaya Tritiya; Demand for mangoes has increased in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.