अवकाळी पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली.
मेथीची एक जुडी ५० रुपयांना तर कोथिंबिरीची जुडी ४२ रुपयांना विकली गेली आहे. या मोसमात पालेभाज्यांना मिळालेला हा उच्चांकी भाव आहे.
गुरुवारी कोथिंबिरीच्या ११ हजार जुड्यांची तर मेथीच्या केवळ १ हजार ३२० जुड्यांची आवक झाली. आवक घटल्याने बाजारभाव कडाडले आहेत.
कोथिंबिरीची जुडी ४२ रुपयांना विकली गेली आहे. शेपूच्या एका जुडीला २५ रुपये भाव मिळाल्याचे सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी सांगितले.
कमी कालावधीत येणारे मेथी, कोथिंबीर पीक पावसाच्या तडाख्याने नष्ट झाल्याने आवक घटली आहे. ही दोन्ही पिके खूप कमी शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिली आहेत. विशेषतः शिरूरचा काही भाग व आंबेगाव तालुक्यातील ठरावीक क्षेत्रात मेथी, कोथिंबीर कशीबशी तग धरून आहे. - कैलास भगवंतराव गावडे, भाजीपाला व्यापारी
अधिक वाचा: पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार