मंगळवेढा : मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मका हमीभाव खरेदी केंद्राच्या ऑनलाइन नाव नोंदणीस बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात होणार आहे.
ही नोंदणी सकाळी ११ वाजता संघाच्या कार्यालयात करण्यात येईल, अशी माहिती संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांनी दिली.
या उपक्रमामुळे मंगळवेढा, तसेच परिसरातील तालुक्यातील सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना संघ कार्यालयाकडून एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच मका हमीभाव खरेदी केंद्रात आणता येणार आहे.
विक्री केलेल्या मक्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन जमा होणार असून, यावर्षी मक्याची आधारभूत किंमत २४०० रुपये निश्चित करण्यात आली असल्याची माहिती अवताडे यांनी दिली.
आवश्यक कागदपत्रे
◼️ सातबारा उतारा (ई-पीक पाहणीसह)
◼️ ८-अ.
◼️ आधारकार्ड.
◼️ बँक पासबुकची स्पष्ट प्रत.
◼️ मोबाइल क्रमांक.
अधिक वाचा: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षभरात शेवग्याचे कसे राहिले दर? वाचा आता कसा मिळतोय दर?
