दिवाळी सणामुळे राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या शेतमालाचे लिलाव बंद आहेत. मात्र काही बाजारपेठांमध्ये लिलाव सुरू असून त्या ठिकाणी मकाची मर्यादित परंतु लक्षणीय आवक होत आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच आज सोमवार (दि.२०) ऑक्टोबर रोजी राज्यभरातील निवडक बाजार समित्यांमध्ये एकूण २०८५ क्विंटल मकाची आवक झाली होती. त्यामध्ये १८३१ क्विंटल पिवळा मका आणि ३१ क्विंटल लाल मक्याचा समावेश होता.
पिवळ्या मकाची नाशिक जिल्ह्याच्या येवला-अंदरसूल बाजार समितीत आज सर्वाधिक १५०० क्विंटल आवक झाली होती. या बाजारात पिवळ्या मक्याला किमान १००० रुपये तर सरासरी १५५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे किमान १४०० रुपये आणि सरासरी १६०० रुपये दर मिळाला.
लाल मकाची आज तलोळा बाजारात सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. येथे लाल मक्याचा किमान दर ११७५ रुपये तर सरासरी दर १५०० रुपये होता. याशिवाय पुणे बाजार समितीत लाल मक्याला सर्वाधिक दर मिळाल्याचे दिसून आले. येथे किमान दर २५०० रुपये तर सरासरी दर २६०० रुपये इतका होता.
तसेच मोर्शी येथे मकाला किमान १२०० रुपये व सरासरी १५१३ रुपये दर मिळाला. राहता बाजारात मक्याला किमान १५०० रुपये आणि सरासरी १५७५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दिवाळीमुळे लिलावाची संख्या कमी असली तरीही काही बाजारांमध्ये झालेल्या व्यवहारांवरून सध्या मकाच्या दरात कमालीची स्थिरता असल्याचे चित्र दिसून येते. आगामी काळात लिलाव पूर्ववत झाल्यानंतर दरात अधिक चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील मका आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
20/10/2025 | ||||||
मोर्शी | ---- | क्विंटल | 201 | 1200 | 1825 | 1513 |
राहता | ---- | क्विंटल | 22 | 1500 | 1650 | 1575 |
पुणे | लाल | क्विंटल | 4 | 2500 | 2700 | 2600 |
तळोदा | लाल | क्विंटल | 27 | 1175 | 1600 | 1500 |
येवला -आंदरसूल | पिवळी | क्विंटल | 1500 | 1000 | 1900 | 1550 |
बुलढाणा-धड | पिवळी | क्विंटल | 331 | 1400 | 1800 | 1600 |
हेही वाचा : शेतमाल विक्रीनंतर २४ तासांत पैसे न मिळाल्यास 'गुलाबी' पावती ठरेल फायद्याची; वाचा सविस्तर