lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > लिंबाचे दर आकारानुसार, मिळतोय चांगला बाजारभाव

लिंबाचे दर आकारानुसार, मिळतोय चांगला बाजारभाव

Lemons are priced according to size, fetching a good market price | लिंबाचे दर आकारानुसार, मिळतोय चांगला बाजारभाव

लिंबाचे दर आकारानुसार, मिळतोय चांगला बाजारभाव

लहान आकाराची लिंब शेकडा ५०० तर मोठ्या आकाराची लिंब शेकडा एक हजार रुपये अशा दराने विकली जात आहेत.

लहान आकाराची लिंब शेकडा ५०० तर मोठ्या आकाराची लिंब शेकडा एक हजार रुपये अशा दराने विकली जात आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

एकीकडे उन्हाचा पारा ३५ अंशापर्यंत पर्यंत पोहचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तर दुसरीकडे लिंबू सरबत पिऊन जीव थंड करणेही अवघड बनले आहे. कारण दोन रुपयांना मिळणारे लिंबू बाजारात आता पाच ते दहा रुपयांना विकले जात आहे.

बाजारपेठेत लिंबाचे दर वाढले आहेत. लहान आकाराची लिंब शेकडा ५०० तर मोठ्या आकाराची लिंब शेकडा एक हजार रुपये अशा दराने विकली जात आहेत. राज्यात विदर्भ, मराठवाडा, पंढरपूर, आंध्र प्रदेश येथून लिंबाची आवक होत असते. मात्र येथून आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत.

आवक रोडावली
उन्हाळ्यात लिंबांना मोठी मागणी असते. गारपीट व अवकाळी पावसामुळे लिंबाच्या बागांना मोठा फटका बसला असून, आवक कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तीच चार महिन्यांपूर्वी बाजारात लहान आकाराची पाच रुपयांना पाच लिंबू मिळत होते. मात्र आता पाच रुपयांत एकच लिंबू मिळत आहे.

लिंबाचे दर आकारानुसार
बाजारपेठेमध्ये सर्वात लहान आकाराची लिंब ५०० रुपये शेकडो, मध्यम आकाराची ६५०, ८००, ९०० तर सर्वात मोठ्या आकाराच्या लिंबाचा शेकडा दर एक हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

शेतकरी बंधूनी लिंबू काढणी करताना अपरिपक्व लिंबाची काढणी करू नये, बऱ्याचदा बाजारभाव चांगले मिळतात त्यामुळे लिंबू लवकर काढले जाते. लिंबाचे दर आकारानुसार ठरले जातात. त्यामुळे योग्यवेळी काढणी करणे जरूरीचे आहे.

Web Title: Lemons are priced according to size, fetching a good market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.