Join us
Daily Top 2Weekly Top 5

लिंबाचे भाव कडाडले; पहिल्यांदाच क्विंटलला पाच अंकी भाव, वाचा काय मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:00 IST

limbu bajar bhav गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने लिंबाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत आवक मर्यादित असल्याने दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

सोलापूर : उन्हाळ्याचा तडाखा वाढत असतानाच सोलापूरच्याबाजारपेठेत लिंबाला सोन्यासारखा भाव मिळत आहे.

येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाच्या दराने या हंगामातील उच्चांकी पातळी ओलांडली आहे.

शनिवारी एका क्विंटलला तब्बल १३,३०० रुपये इतका विक्रमी दर मिळाला आहे. पाच अंकी दरामुळे शेतकरी सुखावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने लिंबाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत आवक मर्यादित असल्याने दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

शनिवारी बाजार समितीत एकूण ३० क्विंटल लिंबाची आवक झाली होती. यावेळी लिंबाला मिळालेला कमाल दर १३,३०० रुपये होता.

तर सर्वसाधारण गुणवत्ता असलेल्या लिंबाला सरासरी ७,००० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला.

अधिक वाचा: तुम्ही खाताय ते पनीर आहे की चीज अ‍ॅनालॉग? एकसारख्या दिसणाऱ्या या पदार्थांत नक्की काय आहे फरक?

English
हिंदी सारांश
Web Title : Lemon Prices Soar: Record High of ₹13,300 Per Quintal

Web Summary : Solapur's lemon prices hit a record ₹13,300/quintal due to soaring demand amidst rising temperatures. Limited supply at the market led to this unprecedented five-figure price, delighting farmers. The average price for standard quality lemons was ₹7,000/quintal.
टॅग्स :बाजारमार्केट यार्डभाज्यासोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेती