Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market Down : टोमॅटो दरात दोन महिने घसरण कायम राहण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

Tomato Market Down : टोमॅटो दरात दोन महिने घसरण कायम राहण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

Latest News Tomato Market down Tomato prices likely to continue falling for two months, read in detail | Tomato Market Down : टोमॅटो दरात दोन महिने घसरण कायम राहण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

Tomato Market Down : टोमॅटो दरात दोन महिने घसरण कायम राहण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

Tomato Market : नववर्षाच्या प्रारंभापासून टोमॅटो मालाच्या बाजारभावाची लाली (Tomato rate) उतरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. 

Tomato Market : नववर्षाच्या प्रारंभापासून टोमॅटो मालाच्या बाजारभावाची लाली (Tomato rate) उतरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : टोमॅटो मालाची आवक (Tomato Market Down) मोठ्या प्रमाणात वाढल्याने टोमॅटो मालाला प्रतिकिलो सात ते आठ रुपये असा बाजारभाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. नववर्षाच्या प्रारंभापासून टोमॅटो मालाच्या बाजारभावाची लाली उतरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. 

महाराष्ट्र राज्यासह देशभरात टोमॅटो दर (Tomato Price Down) कोसळले असल्याने आगामी दोन महिने तरी बाजारभावात सुधारणा होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nashik Market Yard) दैनंदिन पंधरा ते वीस हजार टोमॅटो कॅरेटची आवक होत असून, परराज्यात स्थानिक बाजारपेठेत टोमॅटो मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. 

परिणामी, जानेवारी महिन्यापासून टोमॅटो मालाला उठाव नाही. बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या टोमॅटो मालाला साधारणपणे दीडशे रुपये प्रति (२० किलो) कॅरेट बाजारभाव मिळत असल्याने लागवड, दळणवळण खर्चदेखील सुटत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आगामी दोन महिने तरी टोमॅटो दरात घसरण कायम राहण्याची शक्यता आहे.

टोमॅटोला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने टोमॅटो पिकाची लागवड केली; मात्र बाजारभाव नसल्याने उत्पादन आणि दळणवळण खर्चदेखील सुटत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 
- सोमनाथ हिंडे, शेतकरी, ननाशी

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/01/2025
कोल्हापूर---क्विंटल1895001300900
पुणे-मांजरी---क्विंटल53690023001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल76600850725
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल648400800600
पाटन---क्विंटल7125014501350
संगमनेर---क्विंटल300375900636
खेड-चाकण---क्विंटल3047001200900
सातारा---क्विंटल65100013001150
राहता---क्विंटल54200750500
पंढरपूरहायब्रीडक्विंटल245001200700
कल्याणहायब्रीडक्विंटल37001200950
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल2081512001005
रामटेकहायब्रीडक्विंटल50400600500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल1458001000900
पुणेलोकलक्विंटल237660001500010500
पुणे- खडकीलोकलक्विंटल225001000750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल19100013001150
पुणे-मोशीलोकलक्विंटल4138001000900
नागपूरलोकलक्विंटल7006001000900
वाईलोकलक्विंटल120100019001500
कामठीलोकलक्विंटल69400800600
हिंगणालोकलक्विंटल556001000788
पनवेलनं. १क्विंटल600250030002750
मुंबईनं. १क्विंटल2462100014001200
इस्लामपूरनं. १क्विंटल807001200950
सोलापूरवैशालीक्विंटल234100070004000
जळगाववैशालीक्विंटल99400800600
नागपूरवैशालीक्विंटल300120015001425
कराडवैशालीक्विंटल90100020002000
भुसावळवैशालीक्विंटल38100015001200

 

Web Title: Latest News Tomato Market down Tomato prices likely to continue falling for two months, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.