Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion Market) 01 लाख 63 हजार 651 क्विंटलची आवक झाली. तर आज लाल कांद्याला सरासरी 1812 रुपयांपासून ते 2500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1700 रुपयांपासून ते 2893 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज लाल कांद्याच्या (Red Onion) आवकेत घट झाल्याचे दिसून आलं.
आज 19 जुलै 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याची (Kanda Lilav) 25 हजार क्विंटल चे आवक झाली यात अकलूज, कोल्हापूर बाजारात 2200 रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये 2500 रुपयांचा दर मिळाला. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 12 हजार 617 क्विंटलची झाली. या ठिकाणी 2500 रुपये, धुळे आणि भुसावळ बाजारात 2200 रुपयांचा दर मिळाला. तर लोकल कांद्याला अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सर्वाधिक 3100 चा दर मिळाला तर पुणे बाजारात 2200 रुपयांचा दर मिळाला.
आज उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 2650 रुपये, नाशिक आणि लासलगाव विंचूर बाजारात 2750 रुपये, सिन्नर बाजारात 2700 रुपये, कळवण बाजारात 2600 रुपये, चांदवड, कोपरगाव, पिंपळगाव बसवंत बाजारात 2700 रुपये, तर दिंडोरी वनी बाजारात सर्वाधिक 2893 रुपयांचा दर मिळाला.
असे आहेत सविस्तर बाजार भाव
