Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > अमेरिका-इराण युद्धामुळे सुकामेवा व इंधन दरवाढीचे सावट, या वस्तूंवरही परिणाम होईल!

अमेरिका-इराण युद्धामुळे सुकामेवा व इंधन दरवाढीचे सावट, या वस्तूंवरही परिणाम होईल!

Latest News The US-Iran war will also affect dried fruit and fuel prices see details | अमेरिका-इराण युद्धामुळे सुकामेवा व इंधन दरवाढीचे सावट, या वस्तूंवरही परिणाम होईल!

अमेरिका-इराण युद्धामुळे सुकामेवा व इंधन दरवाढीचे सावट, या वस्तूंवरही परिणाम होईल!

US-Iran war : अमेरिका, इस्त्राइल व इराण या देशांचे युद्ध भडकल्याने अरब राष्ट्रातून येणाऱ्या सुकामेव्यावर भाववाढीचे सावट निर्माण झाले आहे.

US-Iran war : अमेरिका, इस्त्राइल व इराण या देशांचे युद्ध भडकल्याने अरब राष्ट्रातून येणाऱ्या सुकामेव्यावर भाववाढीचे सावट निर्माण झाले आहे.

जळगाव : अमेरिका, इस्त्राइल व इराण या देशांचे युद्ध भडकल्याने अरब राष्ट्रातून येणाऱ्या सुकामेव्यावर भाववाढीचे सावट निर्माण झाले आहे. ऐन रमजान महिन्यात खजूर, अंजीरसह इतरही प्रकारच्या सुकामेव्याला मागणी वाढली असताना इराणमधून येणाऱ्या या वस्तूंच्या आवकवर मोठा परिणाम होण्याचे संकेत दिले जात आहे. दरम्यान, पेट्रोल व डिझेलच्या दरातदेखील काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

इंधनाचेही दर वाढणार
इंधन दरवाढीबाबत साशंकता दळणवळणात महत्त्वाचा घटक असलेल्या पेट्रोल, डिझेलचेही साठे इराणमध्ये आहे. या युद्धामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून सध्यातरी इंधन दरवाढीचे संकेत नाही. सोमवारी सकाळी याविषयी अधिक स्पष्टता होऊ शकते.

या युद्धात इराणमधील इंधन साठ्यांचे नुकसान झाल्यास आवकवर परिणाम होऊन भाववाढ होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र यात झालेल्या भाववाढीचा बोझा सरकारने सहन केला तर ग्राहकांना भाववाढीपासून दिलासा मिळू शकतो.

परिस्थिती अधिक चिघळल्यास आवक ठप्प
अमेरिका व इराण यांच्यातील युद्ध काही दिवसात थांबले नाही व परिस्थिती अधिक चिघळली तर इराणमधून येणाऱ्या सर्वच वस्तूंची आवक ठप्प होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

या वस्तूंवरही परिणाम
जळगावात अमेरिकन बदाम व मामरा बदाम सुद्धा येतो. या मामरा बदामसह साधा (प्लेन) पिस्ता, हिंगदेखील इराणमधून येतो. त्यामुळे या वस्तूंच्याही भाववाढीचे सावट आहे.

सध्या रमजान महिन्यामुळे खजूर, जर्दाळू, अंजीर यांना मागणी वाढली आहे. काही दिवसात बदाम, पिस्ता, काजूलादेखील मागणी वाढेल. त्यात अमेरिका-इराण यांच्यात युद्ध भडकल्याने इराणमधून येणाऱ्या या वस्तूंच्या आवकवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भाववाढीची शक्यता वाढली आहे.
- सुरेश बरडिया, सुकामेवा विक्रेते.
 

Web Title : अमेरिका-ईरान युद्ध से सूखे मेवे, ईंधन की कीमतों में वृद्धि की आशंका

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव से सूखे मेवों के आयात में बाधा आ सकती है, खासकर रमजान के दौरान, जिससे खजूर, अंजीर, बादाम और पिस्ता की कीमतें बढ़ सकती हैं। ईरानी तेल भंडार पर संघर्ष के प्रभाव के आधार पर ईंधन की कीमतें भी बढ़ सकती हैं। संघर्ष बढ़ने पर जलगाँव के व्यापारियों को आपूर्ति में व्यवधान का डर है।

Web Title : US-Iran Conflict Threatens Dry Fruit, Fuel Price Hikes

Web Summary : US-Iran tensions may disrupt dry fruit imports, especially during Ramadan, potentially raising prices of dates, figs, almonds, and pistachios. Fuel prices might also increase depending on the conflict's impact on Iranian oil reserves. Jalgaon traders fear supply disruptions if the conflict escalates.