Lokmat Agro >बाजारहाट > Collector Amba : कलेक्टर आंब्याची नागपूर, पुण्यातही क्रेझ, काय आहे खासियत अन् काय दर मिळतोय?

Collector Amba : कलेक्टर आंब्याची नागपूर, पुण्यातही क्रेझ, काय आहे खासियत अन् काय दर मिळतोय?

Latest News Sironcha Collector mango craze in Nagpur and Pune,see specialty and market price | Collector Amba : कलेक्टर आंब्याची नागपूर, पुण्यातही क्रेझ, काय आहे खासियत अन् काय दर मिळतोय?

Collector Amba : कलेक्टर आंब्याची नागपूर, पुण्यातही क्रेझ, काय आहे खासियत अन् काय दर मिळतोय?

Collector Amba : हा आंबा सर्व आंब्यांपेक्षा आकारात मोठा व वजनानेही जड आहे. आंब्यात गोडवासुद्धा आहे.

Collector Amba : हा आंबा सर्व आंब्यांपेक्षा आकारात मोठा व वजनानेही जड आहे. आंब्यात गोडवासुद्धा आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- कौसर खान 

Collector Amba : मार्च महिन्यापासूनच आंब्यांनी बाजारपेठ (Amba Market) व्यापते; लहान-मोठ्या आकाराचे हे मा आंबे असतात. त्यांचा आकार, गोडवा व नावांनी ते ग्राहकांना आकर्षित करतात. जिल्ह्याच्या बाजारपेठेत तसे बाहेरचेच आंबे येतात; परंतु जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातूनही 'कलेक्टर' आंबा राज्याच्या विविध भागातील बाजारात विक्रीसाठी जातो. कलेक्टर आंब्याची (Collactor Mango) क्रेज नागपूर-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये असून, आपल्या गुणांमुळे तो रुबाब झाडत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli District) शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात कलेक्टर आंब्याच्या (Collector Amba) बागा आहेत. हा आंबा सर्व आंब्यांपेक्षा आकारात मोठा व वजनानेही जड आहे. आंब्यात गोडवासुद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागपूर, पुणे यासारख्या मोठ्या शहरांसह लहान शहरातील ग्राहक कलेक्टर आंबा खरेदीकडे ओढले जातात. काही जण तर फोनवर संपर्क साधून आंबा मागवतात, तर काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हा आंबा परजिल्ह्यांमध्ये पुरविला जातो. महाराष्ट्रसह तेलंगणा व आंध्र प्रदेशातही हा आंबा पोहोचविला जातो.

कुठून आला 'कलेक्टर'?
ब्रिटिश राजवटीत पश्चिम गोदावरीचे तत्कालीन कलेक्टर ग्लासफोर्ड यांनी बाहेरून आंब्याची कलमे आणून या भागात म्हणजेच सिरोंचा परिसरात लावली. कलेक्टरने कलम लावल्यामुळे हा आंबा कलेक्टर नावाने प्रसिद्ध झाला. सिरोंचा भागात बेगनपल्ली, दशेरी, लंगडा, तोतापरी, केसर, आदी प्रजातींचे आंबे बाजारात आहेत; परंतु कलेक्टर आंबा हा आकर्षणाचे केंद्र ठरतो.

आंब्याचे वजन व दर काय?
कलेक्टर आंब्याचे फळ पूर्ण वाढ झाल्यानंतर दीड ते दोन किलोपर्यंत वजनाचे असते. प्रतिकिलो १५० ते २०० रुपये दर याप्रमाणे आंबा विक्री केला जातो. त्या काळात जेव्हा झाडाला पहिल्यांदाच आंबे लागले, तेव्हा फळांचा आकार पाहून नागरिक आश्यर्यचकीत झाले होते, असे जुने जाणकार सांगतात.

तेलंगणा-आंध्र प्रदेशातही विक्री
सिरोंचा येथील प्राणहिता व गोदावरी नदीवर पूल बांधकाम झाल्यापासून येथील कलेक्टर आंबा तेलंगणा व आंध्र प्रदेशात थेट जाऊ लागला. पूल बांधकामांमुळे कलेक्टरच्या विक्रीवरील सीमेच्या मर्यादेची जी बंधने होती, ती तुटली. महाराष्ट्रासह तेलंगणा व आंध्र प्रदेशातही कलेक्टर पोहोचत आहे.

जुनी झाडे शेतात आहेत डौलात
ब्रिटिशकाळात सिरोंचा हे जिल्हा मुख्यालय होते. येथे ग्लासफोर्ड हे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी पंचायत समितीचे सभापती विशेशवरराव कोंड्रा यांच्या शेतात कलेक्टर आंब्याची लागवड करण्यात आली होती. आजही त्यांच्या शेतात आंब्याची ही झाडे आहेत.

Web Title: Latest News Sironcha Collector mango craze in Nagpur and Pune,see specialty and market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.