Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : महाराष्ट्रासह बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा राज्यात कांद्याला काय दर मिळतोय? 

Kanda Market : महाराष्ट्रासह बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा राज्यात कांद्याला काय दर मिळतोय? 

Latest News See Onion Prices in Maharashtra, Bihar, Madhya Pradesh, and Haryana kanda market | Kanda Market : महाराष्ट्रासह बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा राज्यात कांद्याला काय दर मिळतोय? 

Kanda Market : महाराष्ट्रासह बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा राज्यात कांद्याला काय दर मिळतोय? 

Kanda Market : कांदा दरात घसरण (Kanda Market Down) सुरूच असून महाराष्ट्रासह देशातील प्रमुख बाजारांमध्येही परिस्थिती जैसे थे आहे

Kanda Market : कांदा दरात घसरण (Kanda Market Down) सुरूच असून महाराष्ट्रासह देशातील प्रमुख बाजारांमध्येही परिस्थिती जैसे थे आहे

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : कांदा दरात घसरण (Kanda Market Down) सुरूच असून महाराष्ट्रासह देशातील प्रमुख बाजारांमध्येही परिस्थिती जैसे थे आहे. साधारण हजार रुपयांच्या खालीच कांद्याला सरासरी भाव मिळत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र (Maharashtra Kanda Market), मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचा सध्याचा दर (Onion Market Prices) काय आहे, ते पाहुयात. किमती कुठे वाढल्या आहेत किंवा कमी झाल्या आहेत, हे यावरून लक्षात येईल. 

बिहार राज्यातील कांदा बाजारभाव 
१५ मे रोजी बिहारमधील सासाराम आणि ताजपूर बाजरात कांद्याची किमान किंमत १५०० रुपये होती. गेराबारी बाजारात कांद्याची कमाल किंमत ३००० रुपये मिळाली. बाराहाट या बाजारात कमीत कमी १८०० रुपये तर सरासरी दोन हजार रुपये जयनगर बाजारात सरासरी २४०० रुपये तर ताजपुर या बाजारात सरासरी १६०० रुपये दर मिळाला. 

हरियाणा राज्यातील कांदा बाजारभाव 
१५ मे रोजी हरियाणाच्या बाबैन बाजारात कांद्याचा किमान भाव ५०० रुपये प्रति क्विंटल, तर बहादुरगड बाजारात सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटल दराने विकले गेले. तर वल्लभगड या बाजारात कमीत कमी ८०० रुपये सरासरी ०१ हजार रुपये, बरवाला हिसार या बाजारात कमीत कमी ८०० रुपये सरासरी ९०० रुपये दर मिळाला. 

मध्य प्रदेश राज्यातील कांदा बाजारभाव 
१५ मे रोजी मध्य प्रदेशातील बहुत या बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १५० रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक कमी दर मिळाला. तर अगर या बाजारात सरासरी ७०० रुपये अष्ट या बाजारात सरासरी ९०० रुपये, बदनावर या बाजारात सरासरी ५०० रुपये, बडवाणी या बाजारात सरासरी ८०० रुपये, तर भोपाल बाजारात सरासरी ९०० रुपये दर मिळाला. 

राजस्थान राज्यातील कांदा बाजारभाव 
१५ मे रोजी राजस्थान राज्यातील अजमेर बाजारात कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, जयपूर बाजारात कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १०५० रुपये, जोधपुर बाजारात कमीत कमी ४०० रुपये, तर सरासरी ७०० रुपये तर प्रतापगड बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. 

महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव 
१५ मे रोजी महाराष्ट्रातील लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी ११०० रुपये, नाशिक बाजारात ७५० रुपये, पैठण बाजारात सरासरी ९२० रुपये, चांदवड बाजारात १०५० रुपये, नागपूर बाजारात पांढरे कांद्याला १०५० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १०५० रुपये तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी ९०० रुपये दर मिळाला.

Web Title: Latest News See Onion Prices in Maharashtra, Bihar, Madhya Pradesh, and Haryana kanda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.