lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Rice Production : देशात तांदळाचे उत्पादन वाढलं, मात्र शेतकऱ्यांच्या उत्पनात घट, असं का घडलं? 

Rice Production : देशात तांदळाचे उत्पादन वाढलं, मात्र शेतकऱ्यांच्या उत्पनात घट, असं का घडलं? 

Latest News Rice production increased in india, but farmers' income decreased | Rice Production : देशात तांदळाचे उत्पादन वाढलं, मात्र शेतकऱ्यांच्या उत्पनात घट, असं का घडलं? 

Rice Production : देशात तांदळाचे उत्पादन वाढलं, मात्र शेतकऱ्यांच्या उत्पनात घट, असं का घडलं? 

तब्बल १० वर्षांनंतर चालू हंगामात देशातच नव्हे, तर जागतिक तांदूळ बाजारात तेजी निर्माण झाली.

तब्बल १० वर्षांनंतर चालू हंगामात देशातच नव्हे, तर जागतिक तांदूळ बाजारात तेजी निर्माण झाली.

शेअर :

Join us
Join usNext

- सुनील चरपे

नागपूर : तब्बल १० वर्षांनंतर चालू हंगामात देशातच नव्हे, तर जागतिक तांदूळ बाजारात तेजी निर्माण झाली. या तेजीचा देशातील धान उत्पादकांना फायदा हाेण्याची शक्यता निर्माण हाेताच केंद्र सरकारने बिगर बासमती आणि तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लादल्याने दर दबावात आले. परिणामी, सरकारच्या या निर्णयामुळे बाजारातील तेजीच्या लाभापासून धान उत्पादकांना वंचित ठेवण्यात आले. दुसरीकडे, देशात तांदळाचे उत्पादन जरी वाढले असले तरी धान उत्पादकांचे उत्पन्न मात्र घटले आहे.

सन १९८० मध्ये देशात तांदळाचे एकूण उत्पादन ५३६ लाख टन हाेते. ते सन २०२२-२३ मध्ये १,३०८.३७ टनपर्यंत पाेहाेचले. देशात सरासरी १,०९० लाख टन बिगर बासमती तांदळाची मागणी असून, सरासरी उत्पादन १,३०८ लाख टन असल्याने वर्षाकाठी किमान २१८ ते २२० लाख टन तांदूळ देशात शिल्लक राहताे. भारतातून दरवर्षी सरासरी १७५ ते १७७ लाख टन बिगर बासमती आणि सरासरी ३५ लाख टन तुकडा तांदळाची निर्यात व्हायची. चीन हा तुकडा तांदळाचा सर्वाम माेठा आयातदार देश आहे. 

केंद्र सरकारने ऑगस्ट २०२२ ते जुलै २०२३ या काळासाठी बिगर बासमती व तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली हाेती. या निर्यातबंदीला ऑगस्ट २०२३ मध्ये केंद्र सरकारने अनिश्चित काळासाठी मुतदवाढ दिली. शेतकऱ्यांचा राेष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एनसीईल या सरकरी कंपनीच्या माध्यमातून केवळ ४९ लाख टन तांदळाची निर्यात केली. परिणामी, देशात मागणीच्या तुलनेत तांदळाचा किमान १३० लाख टन साठा शिल्लक राहिल्याने दर काेसळले. जगात भारतीय बिगर बासमती तांदळाला भरीव मागणी असताना निर्यातबंदीमुळे या तेजीचा फायदा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मिळू दिला नाही.

धानाची एमएसपी (प्रतिक्विंटल)
   वर्ष   ......  जाडा धान (काॅमन) .... बारीक धान (ग्रेड-ए)
२०१९-२० :-    १,८१५ रुपये -             १,८३५ रुपये
२०२०-२१ :-    १,८६८ रुपये -             १,८८८ रुपये
२०२१-२२ :-    १,९४० रुपये -             १,९६० रुपये
२०२२-२३ :-     २,०४० रुपये -            २,०६० रुपये
२०२३-२४ :-     २,१८३ रुपये -            २,२०३ रुपये

१) सन २०१९ ते २०२३ या चार वर्षात बरीक धानाचे दर सरासरी २,२०० रुपये प्रतिक्विंटल, तर जाड्या धानाचे दर प्रतिक्विंटल १,३०० ते १,६०० रुपये हाेते.
२) सन २०२३-२४ मध्ये बारीक धानाचे दर सरासरी ३,२०० रुपये प्रतिक्विंटल, तर जाड्या धानाचे दर १,७०० रुपये प्रतिक्विंटल हाेते.
३) केंद्र सरकारने सन २०१४-१५ ते २०२३-२४ या १० वर्षांत जाड्या धानाच्या एमएसपीमध्ये प्रतिक्विंटल ८२३ रुपये व बारीक धानाच्या एमएसपीमध्ये ८०३ रुपयांची वाढ केली. मागील पाच वर्षांतील ही वाढ ३६८ रुपये प्रतिक्विंटल एवढी आहे. तुलनेत धानाचा उत्पादन खर्च किमान ६७ टक्क्यांनी वाढला आहे.

जाड्या धानाला ताेटा, तर बारीक धानाला फायदा

धानाचा सरासरी उत्पादन खर्च प्रतिएकर ३२,८०० रुपये आहे. जाड्या धानाचे (बीपीटी-काॅमन) दर दरवर्षी एमएसपीपेक्षा कमी असतात व उत्पादनही कमी हाेते. त्यामुळे या जाडा धान उत्पादकांना प्रतिएकर २,८०० ते ६,१०० रुपयांचा ताेटा सहन करावा लागला. बारीक (ग्रेड-ए) धानाचे दर एमएसपीपेक्षा थाेडे अधिक असतात व उत्पादनही अधिक हाेते. त्यामुळे बारीक धान उत्पादकांना प्रतिएकर १,५०० ते ६,२०० रुपयांचा फायदा झाला आहे. देशात जाड्या धानाचे उत्पादन अधिक हाेते.

Web Title: Latest News Rice production increased in india, but farmers' income decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.