Lokmat Agro >बाजारहाट > Rice Export : भंडारा-गडचिरोलीचा तांदूळ परदेशात लोकप्रिय; निर्यातीला विक्रमी वाढ वाचा सविस्तर

Rice Export : भंडारा-गडचिरोलीचा तांदूळ परदेशात लोकप्रिय; निर्यातीला विक्रमी वाढ वाचा सविस्तर

latest news Rice Export: Bhandara-Gadchiroli rice popular abroad; Exports record growth Read in detail | Rice Export : भंडारा-गडचिरोलीचा तांदूळ परदेशात लोकप्रिय; निर्यातीला विक्रमी वाढ वाचा सविस्तर

Rice Export : भंडारा-गडचिरोलीचा तांदूळ परदेशात लोकप्रिय; निर्यातीला विक्रमी वाढ वाचा सविस्तर

Rice Export : नागपूर विभागातून यावर्षी २२ हजार ६२७ कोटी रुपयांची निर्यात नोंदवली गेली आहे, ज्यामध्ये मागील तीन वर्षांच्या तुलनेत ५ हजार १३० कोटींची वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यातून निर्यात २०३ टक्के तर गडचिरोलीत १८२ टक्के वाढली आहे. वाचा सविस्तर (Rice Export)

Rice Export : नागपूर विभागातून यावर्षी २२ हजार ६२७ कोटी रुपयांची निर्यात नोंदवली गेली आहे, ज्यामध्ये मागील तीन वर्षांच्या तुलनेत ५ हजार १३० कोटींची वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यातून निर्यात २०३ टक्के तर गडचिरोलीत १८२ टक्के वाढली आहे. वाचा सविस्तर (Rice Export)

शेअर :

Join us
Join usNext

नागपूर : औद्योगिक आणि कृषी आधारित उत्पादनांना निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांमुळे नागपूर विभागातून २२ हजार ६२७ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी ५ हजार १३० कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली असून ही वाढ सरासरी २९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (Rice Export)

जिल्हानिहाय निर्यात वाढ

नागपूर जिल्हा: १७ हजार ३४० कोटी (वाढ: ३,८६३ कोटी, २९%)

वर्धा: १ हजार ६ कोटी (३२% वाढ)

गोंदिया: २ हजार १६१ कोटी (२४% वाढ)

भंडारा: ४६५ कोटी (२०३% वाढ)

चंद्रपूर: १ हजार ६२२ कोटी (२०% वाढ)

गडचिरोली: ३२ कोटी (१८२% वाढ)

तांदळाच्या निर्यातीत विशेष प्रगती

गडचिरोली जिल्ह्यात तांदळाच्या निर्यातीमध्ये ९८ टक्के वाढ झाली आहे.

भंडारा जिल्ह्यातून तांदळाची निर्यात २०३ टक्क्यांनी वाढली.

नागपूर जिल्ह्यातून १४ टक्के, गोंदिया ९८ टक्के, भंडारा ६५ टक्के, गडचिरोली ९८ टक्के तांदळाची निर्यात झाली आहे.

वर्धा जिल्ह्यात कापसावर आधारित उत्पादनांमध्ये ५४ टक्के, स्टेपल फॅब्रिकमध्ये २१ टक्के वाढ नोंदवली गेली.

चंद्रपूर जिल्ह्यात शस्त्र आणि शस्त्रास्त्रे आदी उत्पादनांमध्ये ६७ टक्के, पेपर प्रोडक्टमध्ये ११ टक्के वाढ झाली आहे.

औद्योगिक उत्पादनांची निर्यात

गडचिरोली स्टील हब म्हणून विकसित होत असून, येथे कृषी आधारित उद्योग, खनिकर्म, औषध निर्मिती यांसह निर्यातीला सुरुवात झाली आहे. नागपूर विभागातून केवळ कृषी उत्पादनच नाही, तर अभियांत्रिकी, न्युक्लियर रिॲक्टर, स्फोटके (Explosives), फार्मासिटीकल, मेटलवेयर, स्टील, टेक्स्टाईल, जेम्स अॅण्ड ज्वेलरी उत्पादनांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

निर्यात धोरण आणि प्रोत्साहन

निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार, नागपूर विभागातून कृषी आधारित उत्पादनांसोबतच अभियांत्रिकी, न्युक्लियर रिॲक्टर, स्फोटके (Explosives), फार्मासिटीकल, मेटलवेयर, आर्यन ॲण्ड स्टिल, टेक्स्टाईल, जेम्स ॲण्ड ज्वेलरी या उत्पादनांना निर्यातीला मोठ्या प्रमाणात मागणीची शक्यता असल्यामुळे त्यानुसार प्रोत्साहन देण्यात येणार आहे. निर्यात धोरणांनुसार गुंतवणूकदारांना अनुदान दिल्या जात असल्याचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती यांनी सांगितले

मागील निर्यातीचा आकडा

२०२१-२२: १४,५७० कोटी

२०२२-२३: २३३ कोटी

२०२३-२४: १७,४९७ कोटी

नागपूर विभागातील निर्यातीत सातत्यपूर्ण वाढ दिसून येत असून, कृषी तसेच औद्योगिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तांदळाची निर्यात, स्टील, कापसावर आधारित उत्पादन आणि औषधनिर्मिती या क्षेत्रांत विभाग आघाडीवर आहे, ज्यामुळे स्थानिक उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर धोरणात्मक प्रोत्साहन मिळत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Banana Export : कौठ्याची केळी पोहोचली इराणमध्ये; असा मिळतोय भाव जाणून घ्या सविस्तर

Web Title: latest news Rice Export: Bhandara-Gadchiroli rice popular abroad; Exports record growth Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.