Lokmat Agro >बाजारहाट > Nafed Kanda Rate : नाफेड कांदा खरेदीचा नवा दर जाहीर, पण 'या' तारखेपर्यंतच खरेदी? वाचा सविस्तर

Nafed Kanda Rate : नाफेड कांदा खरेदीचा नवा दर जाहीर, पण 'या' तारखेपर्यंतच खरेदी? वाचा सविस्तर

Latest news Nafed kanda kharedi New Nafed onion purchase price announced and deadline 4th august | Nafed Kanda Rate : नाफेड कांदा खरेदीचा नवा दर जाहीर, पण 'या' तारखेपर्यंतच खरेदी? वाचा सविस्तर

Nafed Kanda Rate : नाफेड कांदा खरेदीचा नवा दर जाहीर, पण 'या' तारखेपर्यंतच खरेदी? वाचा सविस्तर

Nafed Kanda Rate : महत्त्वाचं म्हणजे नाफेडच्या खरेदीची मुदत लवकर संपणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Nafed Kanda Rate : महत्त्वाचं म्हणजे नाफेडच्या खरेदीची मुदत लवकर संपणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Nafed Kanda Rate :   कांद्याच्या दरात सातत्याने (Kanda Market Down) घसरण सुरूच आहे. दुसरीकडे नाफेडची खरेदी देखील संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. नाफेडने या आठवड्यातील कांदा खरेदीचा दर (Nafed Kanda Kharedi) जाहीर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे नाफेडच्या खरेदीची मुदत लवकर संपणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

गेल्या महिनाभरापासून नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी (Kanda Kharedi) सुरू करण्यात आले आहे. दर आठवड्यात नाफेड शनिवारच्या दिवशी दर जाहीर करत असते. मागील आठवड्यात नाफेडणे १४६५ दर जाहीर केला होता. या आठवड्यात म्हणजेच आज १४०५ रुपयांचा दर जाहीर करण्यात आला आहे. 

दुसरं महत्त्वाचं म्हणजे नाफेडची खरेदी ही साधारण 31 जुलैपर्यंत होती. त्या अनुषंगाने नाफेडच्या माध्यमातून केंद्राकडे मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र याबाबत अद्यापही सांशकता आहे. कारण मुदत वाढवण्याबाबतच पत्र किंवा इतर माहिती अद्यापही प्राप्त झालेली नाही. 

एकीकडे नाफेडची खरेदी उशिराने सुरू झाली. त्यामुळे अद्यापही नाफेडचे खरेदीचे उद्दिष्ट साध्य झालेले नाही. या पार्श्वभूमीवर नाफेडणे केंद्राकडे मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र अजून याबाबत नाफेड कडून स्पष्टीकरण देण्यात आलेला नाही. केवळ पुढील दोन दिवस म्हणजे चार ऑगस्टपर्यंत खरेदी सुरू राहणार असल्याचे समजते आहे.

Kanda Market : ऑगस्टच्या पहिल्या दिवशी कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Web Title: Latest news Nafed kanda kharedi New Nafed onion purchase price announced and deadline 4th august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.