Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Nafed Kanda Kharedi : नाफेडच्या कांदा खरेदीचा भाव ठरला? अन् बाजारात काय दर मिळतोय?

Nafed Kanda Kharedi : नाफेडच्या कांदा खरेदीचा भाव ठरला? अन् बाजारात काय दर मिळतोय?

Latest news Nafed kanda kharedi Nafed's onion purchase price has been decided | Nafed Kanda Kharedi : नाफेडच्या कांदा खरेदीचा भाव ठरला? अन् बाजारात काय दर मिळतोय?

Nafed Kanda Kharedi : नाफेडच्या कांदा खरेदीचा भाव ठरला? अन् बाजारात काय दर मिळतोय?

Nafed Kanda Kharedi : नाफेडतर्फे सुरू होणारी कांदा खरेदीची प्रतीक्षा साधारण चार ते पाच दिवसांत संपणार असल्याचे चित्र आहे.

Nafed Kanda Kharedi : नाफेडतर्फे सुरू होणारी कांदा खरेदीची प्रतीक्षा साधारण चार ते पाच दिवसांत संपणार असल्याचे चित्र आहे.

नाशिक : नाफेडतर्फे सुरू होणारी कांदा खरेदीची (Kanda kharedi) प्रतीक्षा साधारण चार ते पाच दिवसांत संपणार असून, सुरुवातीला १४३५ रुपये भाव केंद्र सरकारकडून सोमवारीच निश्चित झाल्याची माहिती नाफेडचे जनरल मॅनेजर श्रीवास्तव यांनी 'लोकमत' ला दिली. त्यामुळे नाफेडकडून भाव किती मिळणार, याची उत्सुकतादेखील आता संपली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नाफेड (NAFED) कांदा खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानुसार काही दिवसांपूर्वी नाफेडच्या पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणीही सुरु झाली आहे. तसेच नाफेड कांदा खरेदीची ट्रायल देखील घेतली जात आहे. मात्र अद्याप प्रत्यक्षात खरेदीची तारीख निश्चित झालेली नाही. तत्पूर्वी कांदा खरेदीचा भाव काय असेल? याचे उत्तर नाशिक विभागाचे जनरल मॅनेजर श्रीवास्तव यांनी दली आहे. 

मात्र नाफेडने जाहीर केलेला भाव बाजार समितीपेक्षा कमी असल्याने असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बफरस्टॉकसाठी नाफेडने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे दर यापूर्वी नाफेडच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून ठरविले जात होते. नाफेड कांदा खरेदीचे दर दिल्लीतून ठरविणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार, असे केंद्रकडून सांगण्यात येत आहे.

Nafed Kanda Kharedi : नाफेडकडून कांदा खरेदीची ट्रायल, प्रत्यक्षात कांदा खरेदी केव्हापासून?

Web Title: Latest news Nafed kanda kharedi Nafed's onion purchase price has been decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.