Lokmat Agro >बाजारहाट > Market Update : शेतकऱ्यांची मेहनत आणि बाजारातील दिलासा; आषाढीला फराळ अधिक खास वाचा सविस्तर

Market Update : शेतकऱ्यांची मेहनत आणि बाजारातील दिलासा; आषाढीला फराळ अधिक खास वाचा सविस्तर

latest news Market Update: Farmers' hard work and relief in the market; Read more special Faral on Ashadhi in detail | Market Update : शेतकऱ्यांची मेहनत आणि बाजारातील दिलासा; आषाढीला फराळ अधिक खास वाचा सविस्तर

Market Update : शेतकऱ्यांची मेहनत आणि बाजारातील दिलासा; आषाढीला फराळ अधिक खास वाचा सविस्तर

Market Update : या वर्षी चांगल्या हवामानामुळे आणि उत्पादनातील वाढीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. शेंगदाणा, भगर, साबुदाणा आणि राजगिऱ्याचे दर घसरले असून, बाजारात आवक वाढली आहे. (Market Update)

शेअर :

Join us
Join usNext

Market Update : या वर्षी चांगल्या हवामानामुळे आणि उत्पादनातील वाढीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. शेंगदाणा, भगर, साबुदाणा आणि राजगिऱ्याचे दर घसरले असून, बाजारात आवक वाढली आहे. (Market Update)

याचा थेट फायदा उपवास करणाऱ्या ग्राहकांना मिळत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाला निश्चित मागणी निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी समाधानी, आणि ग्राहकही आनंदी आहेत.(Market Update)

आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) पार्श्वभूमीवर यंदा शेंगदाणा, साबुदाणा, भगर आणि राजगिऱ्याचे दर कमी झाल्याने उपवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. (Market Update)

यंदा उत्पादनात झालेल्या वाढीचा थेट परिणाम दरांवर दिसून येत आहे. त्यामुळे फराळाचे पदार्थ स्वस्तात आणि चविष्ट मिळणार आहेत. (Market Update)

दर कमी होण्यामागचे कारण?

उत्पादनात वाढ

शेंगदाणा उत्पादन महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि तेलंगणामध्येही वाढले.

साबुदाण्याचे उत्पादन विशेषतः तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाले.

भगर आणि राजगिरा उत्पादनही समाधानकारक झाले आहे.

वर्षभरातील भावतफावत

प्रकारजून २०२४ दर (₹/कि.ग्रा.)जून २०२५ दर (₹/कि.ग्रा.)
साबुदाणा६० ते ६४ रुपये५० ते ५६ रुपये
शेंगदाणा११० ते १२० रुपये९० ते ११० रुपये
भगर१०० ते १२० रुपये९० ते ११० रुपये
राजगिरा१०५ ते ११० रुपये९५ ते ११० रुपये

भगरची पुन्हा मागणी वाढली

अलीकडेच भगरमुळे विषबाधेच्या घटना घडल्याने ग्राहकांनी भगर खरेदी टाळली होती.

मात्र, साबुदाण्यामुळे होणारी ॲसिडिटी टाळण्यासाठी अनेक उपवास करणारे पुन्हा भगरकडे वळले.

यंदा ब्रँडेड आणि पॅकिंगमधील भगर जास्त विकली जात आहे.

बाजारात मोठी आवक; दर स्थिर

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारात किती झाली आवक?

२०० टन शेंगदाणा

१५० टन साबुदाण्याची आवक झाली आहे.

त्यामुळे आवक भरपूर असून दर नियंत्रित राहण्याची शक्यता आहे.

शेंगदाण्यात कर्नाटकचा शेंगदाणा चवदार असल्याने तोच अधिक विकला जातो.

साबुदाण्याची मागणी थोडी घटली असली तरी दर वाजवी मिळत आहे.

यंदा आषाढी एकादशीच्या उपवासात चव आणि बचत दोन्ही मिळणार आहेत. उत्पादन वाढले असल्याने बाजार स्थिर आहे, आणि उपवास करणाऱ्यांना परवडणारा फराळ सहज उपलब्ध आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : लाल तूर खातेय भाव; अकोला बाजारात गाठला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Market Update: Farmers' hard work and relief in the market; Read more special Faral on Ashadhi in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.