Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Makka Kharedi : मेळघाटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मक्याची प्रतिहेक्टर खरेदी मर्यादा वाढली

Makka Kharedi : मेळघाटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मक्याची प्रतिहेक्टर खरेदी मर्यादा वाढली

latest news Makka Kharedi: Big relief for farmers in Melghat! Per hectare purchase limit of maize increased | Makka Kharedi : मेळघाटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मक्याची प्रतिहेक्टर खरेदी मर्यादा वाढली

Makka Kharedi : मेळघाटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मक्याची प्रतिहेक्टर खरेदी मर्यादा वाढली

Makka Kharedi : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने मका खरेदीची प्रतिहेक्टर मर्यादा ११ क्विंटलवरून थेट १९ क्विंटल ४१ किलो इतकी वाढवली आहे. त्यामुळे मेळघाटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Makka Kharedi)

Makka Kharedi : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने मका खरेदीची प्रतिहेक्टर मर्यादा ११ क्विंटलवरून थेट १९ क्विंटल ४१ किलो इतकी वाढवली आहे. त्यामुळे मेळघाटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Makka Kharedi)

Makka Kharedi :  मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ (नाशिक) मार्फत करण्यात येणाऱ्या मका खरेदीतील प्रतिहेक्टरी मर्यादा ११ क्विंटलवरून थेट १९ क्विंटल ४१ किलो इतकी वाढवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात मका उत्पादन झाल्याने ही आवश्यकता अधोरेखित झाली होती.(Makka Kharedi)

उत्पादन जास्त झाल्याने ही वाढ आवश्यक होती. आमदार केवलराम काळे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने त्वरित दखल घेत ही सुधारणा लागू केली. यामुळे मका पिकाला योग्य दर आणि योग्य प्रमाणात खरेदीची हमी मिळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.(Makka Kharedi)

मोठ्या उत्पादनामुळे मर्यादा वाढवण्याची मागणी मान्य

मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानुसार कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षकांनी प्रत्यक्ष उत्पादनाचे आकडे ऑनलाइन प्रणालीत नोंदवून पाठवले. त्या आधारे आदिवासी विकास महामंडळाने मका खरेदीची मर्यादा वाढवण्यास मंजुरी दिली.

शेतकऱ्यांसाठी खरेदी हीच सुरक्षितता

मेळघाटातील आदिवासी शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुबाडणुकीचा वारंवार बळी ठरत होते. त्यामुळे महामंडळाद्वारे योग्य दर, योग्य प्रमाणातील खरेदी, वजनात पारदर्शकता यासाठी विशेष खरेदी मोहीम राबवली जाते. मात्र, यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने ११ क्विंटलची मर्यादा अपुरी ठरत होती.

तत्काळ दखल

लोकमतमध्ये मका खरेदीतील मर्यादा आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली. कृषी विभागाने आकडेवारी पाठवल्यानंतर महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक पी. आर. सिरसाठ यांनी अधिकृतरित्या मर्यादा वाढीची माहिती संबंधित खरेदी केंद्रांना कळवली.

मर्यादा वाढली हा मोठा दिलासा

मेळघाटातील अनेक भागांमध्ये मका खरेदी केंद्र ५०–६० किलोमीटर अंतरावर असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या.

वाहतूक खर्च वाढूनही ११ क्विंटलपेक्षा कमी मर्यादेमुळे अनेकांचे नुकसान होत होते.

आता १९.४१ क्विंटल मर्यादेमुळे जास्तीत जास्त उत्पादन खरेदी होणार असल्याने शेतकरी समाधानी आहेत.

मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे मका खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी आम्ही केली होती. ती आता साडेएकोणवीस क्विंटल इतकी वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.-  केवलराम काळे, आमदार

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर निर्णय

* मका खरेदीची मर्यादा ११ वरून १९.४१ क्विंटल

* जास्त उत्पादन असलेल्या शेतकऱ्यांचा मोठा फायदा

* व्यापाऱ्यांकडून होणारी लुबाडणूक कमी

* प्रशासन आणि लोकमतच्या वृत्तामुळे तातडीची दखल

* आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य

हे ही वाचा सविस्तर :  Makka Kharedi : मेळघाटात मका खरेदीचा खडतर प्रवास; काय आहे कारण वाचा सविस्तर

Web Title : मक्का खरीद सीमा बढ़ी: प्रति हेक्टेयर 19.41 क्विंटल की मंजूरी

Web Summary : मेलघाट के किसानों के लिए खुशखबरी! मक्का खरीद सीमा 11 क्विंटल से बढ़कर 19.41 क्विंटल प्रति हेक्टेयर हुई। विधायक काले की अपील और कृषि विभाग की रिपोर्ट से आदिवासी किसानों को लाभ होगा। बढ़ी हुई सीमा उचित मूल्य सुनिश्चित करती है और शोषण को रोकती है।

Web Title : Increased Maize Procurement Limit: 19.41 Quintals Per Hectare Approved

Web Summary : Melghat farmers rejoice as maize procurement limit increases to 19.41 quintals per hectare, up from 11. MLA Kale's appeal to the minister and administration, coupled with the agriculture department's report, ensured the decision, benefiting tribal farmers. The increased limit allows for fair prices and prevents exploitation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.