Maka Bajarbhav : मका पिकाला २२२५ रुपये हमीभाव (Maize MSP) असताना बाजारात हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. देशासह राज्यभरात आवक वाढत असून बाजारभाव (Maka Bajarbhav) जैसे थे आहेत. शिवाय गेल्या आठवड्यात ज्या किंमती होत्या, त्याच किमती मागील आठवड्यात देखील पाहायला मिळाल्या. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये (Maize Market) राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे १०.३० टक्के व ६.१४ टक्के इतकी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी अमळनेर बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक रुपये २२७२ रुपये क्विंटल होती, तर नांदगाव बाजारात सर्वात कमी किंमत २०५० रुपये क्विंटल होती.
खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत २२२५ रुपये प्रति क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती (Maka Bajarbhav) MSP पेक्षा कमी आहेत. तर मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत २०५० रुपये प्रति क्विंटल होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात देखील किंमत समान आहे.
निवडक बाजारातील किंमती
मागील आठवड्यात निवडक बाजारात किमती पाहिले असता नांदगाव बाजारात ०२ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल, अमळनेर बाजारात ०२ हजार २७२ रुपये प्रतिक्विंटल, धुळे बाजारात ०२ हजार १३९ रुपये प्रतिक्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजारात ०२ हजार १०६ रुपये प्रतिक्विंटल आणि जालना बाजारात ०२ हजार ७१ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.