Maka Bajarbhav : मक्याला किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिकचा दर मिळत असून मात्र मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात मक्याच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात मक्याला साधारण 2600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.
मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत रु. 2550 प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे 6.81 टक्के व 16.19 टक्के इतकी वाढ झाली आहे.
खरीप हंगाम 2023-24 साठी किमान आधारभूत किंमत रु. 2090 प्रती क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा जास्त आहेत. खरीप हंगाम 2024-25 साठी किमान आधारभूत किंमत रु. 2225 प्रती क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे. मागील आठवड्यातील काही निवडक बाजार समित्यांमधील बाजारात जसे की नांदगाव बाजारात 2550 रुपये, येवला बाजारात 2651 रुपये, मालेगाव बाजारात 2683 रुपये मनमाड बाजार 2697 रुपये तर अमळनेर बाजारात 2703 रुपयांचा दर मिळाला होता.
आज काय बाजारभाव
पुणे बाजारात कमीत कमी 2700 रुपये, तर सरासरी 2800 रुपये आणि पिंपळगाव भोकरदन रेणू बाजारात सरासरी 2150 रुपये दर मिळाला. तर काल सोलापूर बाजारात 2700 रुपये, पुणे बाजारात 2850 रुपये, मुंबई बाजारात 42 रुपये, तर राहुरी बाजारात 1250 रुपये दर मिळाला.