Lokmat Agro >बाजारहाट > Vegetable Rate : अवकाळीचा फटका, आवक घटली, मागणी वाढली, वाचा भाजीपाला दर 

Vegetable Rate : अवकाळीचा फटका, आवक घटली, मागणी वाढली, वाचा भाजीपाला दर 

Latest News Low inflow and high demand, increase in price of leafy vegetables | Vegetable Rate : अवकाळीचा फटका, आवक घटली, मागणी वाढली, वाचा भाजीपाला दर 

Vegetable Rate : अवकाळीचा फटका, आवक घटली, मागणी वाढली, वाचा भाजीपाला दर 

अवकाळी पाऊस सुरू असल्याने पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

अवकाळी पाऊस सुरू असल्याने पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यंदा उन्हाचा पारा चाळीशीपार झाल्याने तसेच काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्याने पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अशांतच आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने सर्वच पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी नाशिकच्या बाजारात १४० रुपये किलो दरापर्यंत वटाणे तर गवार १३५ ते १५० रूपये होती. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर स्थिरावले असून, घाऊक बाजारपेठेत १५ ते २० रुपये किलो दराने कांदा उपलब्ध आहे. 

नाशिक जिल्हा व परिसरातून माल येतो. हलक्या प्रतीचा कांदा १० ते १५ रुपये किलो दराने उपलब्ध आहे. भाज्यांचे वाढलेले दर आटोक्यात येतील असे वाटत असताना तीन महिन्यांपासून दर कमी न झाल्याने दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तापमानामुळे भाजीपाल्याचे दर वाढताना त्यात अवकाळी पाऊस बरसू लागला आहे. 

लसूण महागला

कांदे आणि बटाट्याचे दर प्रतिकिलो २० ते ३० रुपये आहेत; तर लसण २०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. गत आठवड्याच्या तुलनेने लसणाच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली. गेल्या काही आठवड्यांपासून पालेभाज्यांचे दर वाढल्याने दोडके, गवार, वांगी, कारले, फ्लोअर, सिमला मिर्ची यासह इतरही पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. तर बोटावर मोजण्याइतक्या भाज्यांचे दर कमी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले असून, उघड्यावरील कांदाही मोठ्या प्रमाणात भिजला आहे.

असे आहेत भाजीपाला दर (किलो आणि नगामध्ये)
वांगी 45 रुपये, फुलकोबी 60 रुपये, गवार 50 रुपये, शिमला मिरची 60 रुपये, शेवगा 80 रुपये, भेंडी 40 रुपये, कारले 43 रुपये. 

Web Title: Latest News Low inflow and high demand, increase in price of leafy vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.