Kanda Market : आज नरक चतुर्दशीच्या दिवशी काही निवडक बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव पार पडले. यामध्ये जवळपास ३ हजार क्विंटल कांदा झाली. चंद्रपूर, जळगाव, नागपूर, पुणे, सोलापूर या बाजारांमध्ये कांदा लिलाव झाले. कमीत कमी ०१ हजार रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाले.
आज २० सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात लोकल कांद्याची ३३ क्विंटल ची आवक होऊन कमीत कमी १०० रुपये तर सरासरी एक हजार रुपये पुणे बाजारात ३१८ क्विंटल कांदा दाखल होऊन सरासरी १७५० रुपये दर मिळाला.
याच बाजारात नंबर एकचा ३८० क्विंटल कांदा दाखल झाला. या कांद्याला सरासरी १२०० रुपये, नागपूर बाजारात पांढरा कांदा ८२० क्विंटल दाखल झाला. या कांद्याला कमीत कमी १५०० रुपये तर सरासरी १८७५ रुपये दर मिळाला.
लाल कांद्याला (Lal Kanda Market) सरासरी १५६७ रुपये लोकल कांद्याला १७७० रुपये तर जळगाव जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ८०० रुपये तरी सरासरी ०१ हजार रुपये आणि चंद्रपूर जिल्ह्यात कमीत कमी १४०० रुपये तर सरासरी १७०० रुपये दर मिळाला.
इथे वाचा सविस्तर दर
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
20/10/2025 | ||||||
चंद्रपुर | --- | क्विंटल | 730 | 1400 | 2500 | 1700 |
जळगाव | उन्हाळी | क्विंटल | 6 | 800 | 1000 | 1000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 28 | 1520 | 2020 | 1770 |
नागपूर | लाल | क्विंटल | 1007 | 1250 | 1700 | 1567 |
नागपूर | पांढरा | क्विंटल | 820 | 1500 | 2000 | 1875 |
पुणे | नं. १ | क्विंटल | 380 | 300 | 1590 | 1200 |
पुणे | लोकल | क्विंटल | 318 | 1150 | 2350 | 1750 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 33 | 100 | 1300 | 1000 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 3322 |