Lokmat Agro >बाजारहाट > लासलगाव मार्केटला डाळिंब, ड्रॅगन फ्रूटसह टोमॅटो लिलाव, काय दर मिळाले? 

लासलगाव मार्केटला डाळिंब, ड्रॅगन फ्रूटसह टोमॅटो लिलाव, काय दर मिळाले? 

Latest News Lasalgaon Market auctioned tomatoes along with pomegranates, dragon fruit see details | लासलगाव मार्केटला डाळिंब, ड्रॅगन फ्रूटसह टोमॅटो लिलाव, काय दर मिळाले? 

लासलगाव मार्केटला डाळिंब, ड्रॅगन फ्रूटसह टोमॅटो लिलाव, काय दर मिळाले? 

Agriculture News : लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर डाळिंब, ड्रॅगन फ्रूट व टोमॅटो लिलावाला सुरवात झाली.

Agriculture News : लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर डाळिंब, ड्रॅगन फ्रूट व टोमॅटो लिलावाला सुरवात झाली.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर डाळिंब, ड्रॅगन फ्रूट व टोमॅटो लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे उपसभापती संदीप (ललित) दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील  (Nashik District) निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव व सिन्नरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगाखेड, वैजापूर व कन्नड आदी तालुक्यातील गावांमध्ये शेतकरी बांधवांनी डाळिंब, ड्रॅगन फ्रूट व टोमॅटो ह्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय व्हावी, यासाठी बाजार समितीतर्फे गेल्या १० ते ११ वर्षापासून डाळिंब, मागील वर्षापासून ड्रॅगन फ्रुट व ३० वर्षापासून टोमॅटो लिलावास सुरुवात केलेली आहे.

मुहूर्तावर गोंदेगाव, ता. निफाड येथील शेतकरी भाऊसाहेब साळवे यांचा डाळिंब हा शेतीमाल ३ हजार ७०० रुपये प्रती क्रेट्स या दराने गुलजार फ्रूट अॅण्ड व्हेजिटेबल कंपनी यांनी खरेदी केला. तसेच गोंदेगाव, ता. निफाड येथील शेतकरी बालाजी साळवे यांचा ड्रॅगन फ्रुट हा शेतीमाल २१०० रुपये प्रतिक्रेट्स ह्या दराने खरेदी केला.

डाळिंबाला सरासरी २५०० रुपये दर
शिवापूर, ता. निफाड येथील शेतकरी विक्रम जगताप यांचा टोमॅटो हा शेतीमाल २५०० रुपये प्रतिक्रेट्स ह्या दराने शिवशंभू ट्रेडर्स यांनी खरेदी केला. लिलावाचे दिवशी दिवसभरात एकूण १३५ क्रेट्स मधून डाळिंब हा शेतीमाल विक्रीस आला. त्यास कमीत कमी ११००, जास्तीत जास्त ३७०० व सरासरी २५०० रुपये प्रतिक्रेट्स भाव मिळाला. 

तसेच २५ क्रेट्समधून ड्रॅगन फ्रुट हा शेतीमाल विक्रीस आला. त्यास कमीत कमी १००० रुपये जास्तीत जास्त २१०० रुपये व सरासरी १९०० रुपये प्रती क्रेट्स भाव मिळाला. त्याचप्रमाणे ५४५ क्रेट्समधून टोमॅटो हा शेतीमाल विक्रीस आला. त्यास कमीत कमी ५०० रुपये, जास्तीत जास्त २५०० रुपये व सरासरी १५०० रुपये प्रतिक्रेट्स भाव मिळाला.

Kanda Market : ऑगस्ट महिन्यात कांद्याला काय दर मिळतील, परिस्थिती काय राहील? वाचा सविस्तर

Web Title: Latest News Lasalgaon Market auctioned tomatoes along with pomegranates, dragon fruit see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.