Lal Kanda Market : आज ०९ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची सर्वाधिक ०१ लाख क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी १५० रुपये तर सरासरी १०२५ रुपये दर मिळाला.
सोलापूर मार्केट मध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ९०० रुपये तर लासलगाव मार्केटमध्ये कमीत कमी पाचशे रुपये तरी सरासरी १२४० रुपये दर मिळाला. आज दिवसभरात ०३ लाख क्विंटल कांदा आवक झाली.
लाल कांद्याला येवला मार्केटमध्ये १०७० रुपये, नागपूर मार्केटमध्ये १७२५ रुपये, कळवण मार्केटमध्ये १०५० रुपये तर देवळा मार्केटमध्ये १२५० रुपये दर मिळाला.
तसेच पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी एक हजार रुपये मंगळवेढा मार्केटमध्ये १३०० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला ११२५ रुपये तर नाशिक मार्केटमध्ये ११०० रुपये दर मिळाला.
तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी २४०० रुपये, कोल्हापूर मार्केटमध्ये ०१ हजार रुपये विटा मार्केटमध्ये १३५० रुपये तर शेवगाव मार्केटमध्ये नंबर एकच्या कांद्याला १०५० रुपये दर मिळाला.
