Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > चाळीसगाव मार्केटला लाल कांद्याची विक्रमी आवक, मागील पाच दिवसांत भाव काय मिळाला?

चाळीसगाव मार्केटला लाल कांद्याची विक्रमी आवक, मागील पाच दिवसांत भाव काय मिळाला?

Latest News Lal kanda Market record arrival of red onions in five days in kanda market | चाळीसगाव मार्केटला लाल कांद्याची विक्रमी आवक, मागील पाच दिवसांत भाव काय मिळाला?

चाळीसगाव मार्केटला लाल कांद्याची विक्रमी आवक, मागील पाच दिवसांत भाव काय मिळाला?

Lal Kanda Market : चाळीसगाव बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये गेल्या पाच दिवसात लाल कांद्याची विक्रमी आवक झाली.

Lal Kanda Market : चाळीसगाव बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये गेल्या पाच दिवसात लाल कांद्याची विक्रमी आवक झाली.

जळगाव : चाळीसगाव बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये गेल्या पाच दिवसात लाल कांद्याची विक्रमी आवक होत असून रब्बी हंगामातील मक्यानेही बाजार समितीत पदार्पण केले आहे. लाल कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र यंदा वाढल्याने आवक वाढली आहे. 

पाच दिवसात मिळाला १२७७ रुपयांचा भाव
गेल्या पाच ते सहा दिवसात बाजार समितीत लाल कांद्याची विक्रमी आवक होत आहे. वाहनांच्या रांगा लागत आहे. १६ रोजी १२७७ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. २३ रोजी सोमवारी मात्र हे भाव प्रतिक्विंटल २०० रुपयांनी खाली कोसळले. १०७८ रुपये प्रतिक्विंटलने लिलाव पुकारले गेले.

किरकोळ बाजारात उसळी
लाल कांदा साठवता येत नसल्याने तो विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणातील थंडी गायब झाली असून उन्हाचा पारा वाढला आहे. अभ्राच्छादित वातावरण असल्यानेही अवकाळी पावसाचे सावटही आहे. त्यामुळे लाल कांद्याची आवक वाढली आहे. 

घाऊक बाजारात कांद्याचे दर १३०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास असून किरकोळ बाजारात मात्र एक किलोसाठी ग्राहकांना २० ते २२ रुपये मोजावे लागत आहे. टिकणारा भगव्या कांद्याची आवक अजून बाजारात समितीत झाली नाही. त्यामुळे मार्चच्या अखेरपर्यंत लाल कांदाच विक्रीसाठी येणार आहे.

काहीअंशी तेजी
बाजार समितीत नांदगावसह, कन्नड, पाचोरा, भडगाव आदी तालुक्यातूनही लाल कांद्याची आवक होत आहे. भावातदेखील तेजी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

हरभऱ्याच्या किंमती 5.65 टक्क्यांनी घसरल्या, लोकल, चाफा, गरडा हरभऱ्याला काय दर आहेत?

 

Web Title : चालीसगांव मंडी में लाल प्याज की रिकॉर्ड आवक; कीमतों में उतार-चढ़ाव।

Web Summary : चालीसगांव मंडी में अधिक खेती के कारण लाल प्याज की आवक में तेजी आई है। कीमतें शुरू में ₹1277/क्विंटल तक पहुंच गईं, लेकिन फिर ₹1078 तक गिर गईं। खुदरा कीमतें ₹20-22/kg पर ऊंची बनी हुई हैं। आस-पास के क्षेत्रों से आवक बाजार गतिविधि में योगदान करती है।

Web Title : Chalisgaon Market Sees Record Red Onion Arrival; Price Fluctuations Noted.

Web Summary : Chalisgaon market witnesses a surge in red onion arrivals due to increased cultivation. Prices initially hit ₹1277/quintal but dropped to ₹1078. Retail prices remain high at ₹20-22/kg. Arrivals from nearby regions contribute to market activity.