Lokmat Agro >बाजारहाट > Keli Market : मागील सात महिन्यात केळीचे दर किती रुपयांनी घसरले? वाचा सविस्तर 

Keli Market : मागील सात महिन्यात केळीचे दर किती रुपयांनी घसरले? वाचा सविस्तर 

Latest News Keli Market Banana prices fell by thousand rupees in last seven months, read in detail | Keli Market : मागील सात महिन्यात केळीचे दर किती रुपयांनी घसरले? वाचा सविस्तर 

Keli Market : मागील सात महिन्यात केळीचे दर किती रुपयांनी घसरले? वाचा सविस्तर 

Keli Market : एकीकडे लागवड क्षेत्रात वाढ होत असताना, दुसरीकडे केळी उत्पादकांच्या (Banana Farmer) अडचणींमध्येही वाढ होत आहे.

Keli Market : एकीकडे लागवड क्षेत्रात वाढ होत असताना, दुसरीकडे केळी उत्पादकांच्या (Banana Farmer) अडचणींमध्येही वाढ होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव : ४६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणारे केळीचे (Banana Sowing) क्षेत्र यंदा ५६ हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे. एकीकडे लागवड क्षेत्रात वाढ होत असताना, दुसरीकडे केळी उत्पादकांच्या अडचणींमध्येही वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्यात २२०० ते २३०० रुपये दर असलेले केळीचे दर (Keli Market)  सद्य:स्थितीला ८०० ते १३०० रुपयांवर आले आहेत. 

मागील काही महिन्यांचा विचार केला तर केळीचे दर (Banana Market) हजार रुपयांनी घसरल्याचे दिसून येते. जून महिन्यात क्विंटलला कमीत कमी १८०० रुपये ते सरासरी २५०० रुपये, जुलै महिन्यात कमीत कमी १४०० रुपये ते सरासरी २००० रुपये, ऑगस्ट महिन्यात कमीत कमी २२०० रुपये ते सरासरी ३००० रुपये, सप्टेंबर महिन्यात कमीत कमी २२०० रुपये ते सरासरी २८०० रुपये, ऑक्टोबर महिन्यात कमीत कमी २ हजार रुपये ते सरासरी २४०० रुपये, नोव्हेंबर महिन्यात कमीत कमी १४०० रुपये ते सरासरी १८०० रुपये, डिसेंबर महिन्यात कमीत कमी ८०० रुपये ते सरासरी १३०० रुपये दर मिळाला. 

दर १ हजार रुपयांनी घसरले... 
ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यांत केळीची आवक कमी झाल्यामुळे केळीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. ऑगस्ट महिन्यात केळीचे दर ३ हजार रुपये प्रतिक्चेिटलपर्यंत पोहोचले होते. मात्र, या महिन्यात केळीच्या दरात घट होत जात आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केळीचे दर १८०० ते २ हजार रुपये इतके होते. त्यानंतर सातत्याने घट होऊन, ८०० ते १३०० रुपयांवर दर आले आहेत. महिन्याभरातच केळीच्या दरात १ हजार रुपयांची घट झाली आहे.

केळीच्या दरात घट होण्याची कारणे 
जळगावच्या केळीला सर्वाधिक उत्तर भारतात मागणी आहे. मात्र. उत्तरेत थंडी वाढल्यामुळे केळीची मागणी कमी झाली आहे. एकीकडे थंडीमुळे केळीची मागणी कमी होत असताना, दुसरीकडे पपईची मागणी वाढली आहे. स्थानिक मार्केटमध्येही केळीची मागणी कमी आली आहे. बाहेरील देशांमध्ये केळीच्या होणाऱ्या निर्यातीतदेखील घट झाल्यामुळे केळीच्या दरात घट झाल्याचे बोलले जात आहे.

Soyabean Hamibhav : सोयाबीनला सरकारी हमीभावापेक्षा 18 टक्क्यांनी कमीच भाव, वाचा सविस्तर

Web Title: Latest News Keli Market Banana prices fell by thousand rupees in last seven months, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.