Kanda Market : एकीकडे कांदा बाजारात (Kanda Market Down) घसरण सुरु आहे. जवळपास १०० ते १५० रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे बांग्लादेशातील व्यापारी वर्गाने किंवा आयातदारांनी स्थानिक सरकारला पत्र लिहत कांदा आयात करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा निर्णय होण्याची शक्यता असून बाजार बदलतील अशीही एक शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर कमी आहेत. त्यामुळे कांदा निर्यातीला (Kanda Niryat) चालना मिळावी या अपेक्षेत शेतकरी आहेत. तसेच बांग्लादेशात कांदा निर्यात होईल, अशीही एक चर्चा गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरु आहे. मात्र बांग्लादेशच्या बाजूने बॉर्डर बंद असली तरी आपल्या बाजूने मात्र सुरु आहे. दरम्यान तेथील स्थानिक मार्केटमध्ये बाजार भाव वाढत आहेत.
म्हणूनच तिथले व्यापारी किंवा तिथले आयातदार मागणी करत आहेत की भारताचा कांदा जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत स्थानिक बाजार स्थिर होणार नाहीत. याबाबतचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून बांगलादेशचे जे आयातदार आहे, त्यांची संघटना आहे. त्या संघटनेचं एक बंगाली भाषेतलं पत्र वायरल होत आहे. यामध्ये त्यांनी आयात खुली करण्याची मागणी केली आहे.
या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे कि, सध्या बाजार वाढले आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात अस्थिरता येऊ शकते. यासाठी आयातीचा परवाना खुला करा. जेणेकरून बाजार दर स्थिर होतील. याबाबतचे हे पत्र स्थानिक आयातदारांनी तेथील कृषी मंत्रालय आणि कृषी सचिवालय यांना दिले आहे. त्यामुळे बांगलादेशची आयात सुरु झाल्यास भारतीय कांद्याची निर्यात वाढेल. परिणामी भारतातील कांदा बाजारात बदल दिसून येतील.
"बांगलादेश हा मोठा आयातदार देश आहे. जर तो भारतीय मार्केटमध्ये सहभागी झाला, तर निश्चितच शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो आणि त्यांना मोठा फायदा होईल."
- विकास सिंग, कांदा निर्यातदार, नाशिक
Kanda Market : ऑगस्ट महिन्यात कांद्याला काय दर मिळतील, परिस्थिती काय राहील? वाचा सविस्तर