Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Niryat : बांगलादेशला कांद्याच्या किती गाड्या जात आहेत, पुढे निर्यात कशी राहील, वाचा सविस्तर 

Kanda Niryat : बांगलादेशला कांद्याच्या किती गाड्या जात आहेत, पुढे निर्यात कशी राहील, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Niryat How many onion truck going to Bangladesh, how will exports continue, read in detail | Kanda Niryat : बांगलादेशला कांद्याच्या किती गाड्या जात आहेत, पुढे निर्यात कशी राहील, वाचा सविस्तर 

Kanda Niryat : बांगलादेशला कांद्याच्या किती गाड्या जात आहेत, पुढे निर्यात कशी राहील, वाचा सविस्तर 

Kanda Niryat : बांगलादेशला जाणाऱ्या कांदा निर्यातीची स्थिती काय आहे, पुढे कशी राहील, ते पाहुयात...

Kanda Niryat : बांगलादेशला जाणाऱ्या कांदा निर्यातीची स्थिती काय आहे, पुढे कशी राहील, ते पाहुयात...

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Niryat :  मागील आठवड्यात कांदा बाजारभावात (Kanda Market) काहीशी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत होते. मात्र पुन्हा एकदा दरातील चढ उतार बाजारात दिसू लागले आहेत. दुसरीकडे बांगलादेशने स्थानिक व्यापाऱ्यांना आयातीला परवानगी दिल्यानंतर संथगतीने निर्यात सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. सद्यस्थितीत निर्यातीची परिस्थिती काय आहे, कशी राहील, ते पाहुयात... 

सद्यस्थितीत लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) कांद्याला सरासरी १५०० रुपये दर मिळतो आहे. मागील आठवड्यात म्हणजेच १६ ऑगस्ट रोजी हा दर १६०० रुपये होता. दुसरीकडे निर्यातीची स्थिती पाहिली तर संथगतीने सुरु आहे. अजूनही अपेक्षित अशा गाड्या पोहचत नसल्याचे समजते आहे. मात्र साधारण रोजच्या रोज २० ते २२ गाड्या बॉर्डरवर जात आहेत. 

आज २४ ऑगस्ट रोजी घोजडंगा इंडियन चेक पोस्ट या ठिकाणी जवळपास कांद्याचे २९ ट्रक पोहचले आहेत. हा आकडा रोज कमी अधिक होत आहे. शिवाय पुढील काही दिवसात यात वाढ होण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली आहे. परिणामी मागील काही दिवसांत भारतीय कांदा बांगलादेशमध्ये पोहचला. त्यांनतर स्थानिक शेतकऱ्यांनी देखील चाळीतील कांदा बाजारात आणला, त्यामुळे तेथील बाजार घसरल्याचे समजते. 

मात्र या पुढील आठवड्यात नवा आयपी येणार असल्याने मागणी वाढणार आहे. परिणामी कांदा निर्यातीत सुधारणा होईल, अशीही शक्यता आहे. सद्यस्थितीत जुन्या आयपीद्वारे कांदा मागविला जात असल्याने कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. 

सोमवार, मंगळवारपासून निर्यात सुरळीत चालू होईल, अशी अशा आहे. तेथील स्थानिक शेतकरी कांदा बाजारात आणत आहे. तसेच जुन्या आयपीद्वारे कांदा ट्रक बॉर्डरवर येत कमी प्रमाणात आहेत. मात्र नवा आयपी येत असल्याने निर्यात वाढण्याची शक्यता आहे. 
- विकास सिंग, उपाध्यक्ष, कांदा निर्यातदार संघटना, नाशिक 

 

Kanda Market : बैलपोळ्याला कांद्याला क्विंटलमागे काय दर मिळाले, वाचा सविस्तर बाजारभाव

Web Title: Latest News Kanda Niryat How many onion truck going to Bangladesh, how will exports continue, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.