Kanda Bajarbhav : आज ६ एप्रिल रोजी कांद्याची जवळपास ०२ लाख ३० हजार क्विंटल हून अधिक आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ०२ लाख क्विंटल, लाल कांद्याची ४३ हजार क्विंटल तर मुंबई मार्केटमध्ये १७ हजार क्विंटल आणि सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याची २६ हजार क्विंटल ची आवक झाली.
उन्हाळ कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये सरासरी ११२५ रुपये, नाशिक मार्केटमध्ये १०५० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये १२०० रुपये, देवळा मार्केटमध्ये ०१ हजार रुपये तर साखरी मार्केटमध्ये ८९० रुपये असा दर मिळाला.
तसेच लाल कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये ९५० रुपये, येवला मार्केटमध्ये ८७५ रुपये, सोलापूर मार्केट मध्ये ७०० रुपये, देवळा मार्केटमध्ये ८०० रुपये असा दर मिळाला. तर पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला ९५० रुपये आणि नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला ११५० रुपये असा दर मिळाला.
