Kanda Market Update : गेल्या महिन्याभरापासून कांदा दरात (Kanda Market) घसरण सुरूच आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कांद्याचा भाव गेल्या महिन्यात 3600 रुपयांच्या तुलनेत आता 2500 ते 2000 रुपयांवर गेला आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात वाढलेली थंडी (Maharashtra Weather) आणि गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांतून कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण होत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे घाऊक बाजारात कांद्याचे भाव (Kanda Market) गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या घसरणीमुळे देशातील अनेक राज्यातील शेतकरी प्रचंड नाराज आहेत, कारण त्यांना त्यांचा खर्चही निघत नाही. गेल्या महिनाभरात कांद्याचे भाव 44 टक्क्यांनी घसरले आहेत. महिनाभरापूर्वी 5 हजार क्विंटल जाणारा कांदा सद्यस्थितीत 2500 रुपयांवर येऊन ठेपला आहे.
कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात 3600 रुपयांच्या तुलनेत आता कांद्याचा भाव 2000 ते 2500 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात वाढलेली थंडी आणि गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांतून कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.
देशभरातील कांदा बाजारभाव
उत्तराखंडमधील हरिद्वार बाजारात कमीत कमी 1200 रुपये तर सरासरी 1500 रुपये, गुडगाव बाजारात कमीत कमी 1000 रुपये, तर सरासरी 02 हजार रुपये, पंजाबमधील रय्या बाजारात सरासरी 3200 रुपये, राजस्थानमधील जयपुर ग्रामीण बाजारात सरासरी 04 हजार 400 रुपये, त्रिपुरा बाजारातील तेलियामुरा बाजारात सरासरी 3100 रुपये, उत्तर प्रदेशातील चांदपूर बाजारात 2100 रुपये, अवागढ बाजारात 2900 रुपये, तर राजस्थान राज्यातील जैसलमेर बाजारात 2500 रुपये दर मिळतो आहे.