Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : बांगलादेश, श्रीलंका कांदा निर्यात सुरु आहे की बंद, रेट वाढतील का? आज काय दर मिळाले? 

Kanda Market : बांगलादेश, श्रीलंका कांदा निर्यात सुरु आहे की बंद, रेट वाढतील का? आज काय दर मिळाले? 

Latest news kanda market status of Bangladesh and Sri Lankan exports see todays market prices | Kanda Market : बांगलादेश, श्रीलंका कांदा निर्यात सुरु आहे की बंद, रेट वाढतील का? आज काय दर मिळाले? 

Kanda Market : बांगलादेश, श्रीलंका कांदा निर्यात सुरु आहे की बंद, रेट वाढतील का? आज काय दर मिळाले? 

Kanda Market : कांद्याचे दर घसरत आहेत, शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. पुढे जाऊन हे दर वाढतील का?

Kanda Market : कांद्याचे दर घसरत आहेत, शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. पुढे जाऊन हे दर वाढतील का?

नाशिक : जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये सोमवारी उच्च प्रतीच्या कांद्याला १००० रुपये क्विंटल दर निघाला. अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याला सरासरी ८०० ते १००० रुपये क्विंटलप्रमाणे दर आहेत. 

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मात्र क्विंटलला १५०० रुपये आहे.  गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये तेथील स्थानिक कांदा बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात महाराष्ट्रातील कांद्याला मागणी नाही.

बांगलादेश, श्रीलंका निर्यात बंद
गत तीन महिन्यांपासून बांगलादेशने कांद्याची निर्यात बंद केली आहे. यापूर्वी सरकारने अनेकदा निर्यातबंदी केल्याने बांगलादेश आता कांदा उत्पादनात स्वयंपूर्ण होऊ पाहत आहे. दुसरीकडे श्रीलंकेने भारतातील कांदा - आयातीवर ५ टक्के शुल्क लावले आहे. या दोन्ही देशांमध्ये सध्या पाकिस्तान व चीनमधील कांदा निर्यात झाला आहे.


आजचे बाजारभाव कसे आहेत? 

आज ११ फेब्रुवारी रोजी लासलगाव मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, अकलुज मार्केटमध्ये कमीत कमी २०० रुपये सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

तर नागपूर जिल्ह्यात कमीत कमी ०१ हजार रुपये सरासरी १३२५ रुपये दर मिळाला. दुसरीकडे धुळे मार्केटमध्ये कमीत कमी ५५० रुपये तर सरासरी १०५० रुपये,  जळगाव मार्केटमध्ये कमीत कमी ३७५ रुपये तर सरासरी ८६२ रुपये दर मिळाला. 

पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये सरासरी ०१ हजार रुपये, नागपूर जिल्ह्यात पांढऱ्या कांद्याला कमीत कमी १६०० रुपये तर सरासरी १८७५ रुपये, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सरासरी ८५० रुपये, कराड मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये तर सातारा जिल्ह्यात सरासरी १२५० रुपये दर मिळाला. 

Web Title : प्याज बाजार: निर्यात स्थिति, मूल्य विश्लेषण और आज के बाजार भाव

Web Summary : बांग्लादेश और श्रीलंका ने प्याज का आयात रोका; स्थानीय कीमतें व्यापक रूप से भिन्न हैं। किसान बाजार दरों से अधिक उत्पादन लागत से जूझ रहे हैं। लासलगांव में शीर्ष मूल्य ₹1000/क्विंटल रहा।

Web Title : Onion Market: Export Status, Price Analysis, and Market Rates Today

Web Summary : Bangladesh and Sri Lanka halt onion imports; local prices vary widely. Farmers struggle with production costs exceeding market rates. Lasalgaon saw top prices at ₹1000/quintal.