Kanda Market : आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्यातील कांदा मार्केटमध्ये ३३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. आजच्या दिवशी अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्येच लिलाव पार पडले कमीत कमी ६०० रुपयांपासून सरासरी १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक २८ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी २५० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला तर पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी ०१ हजार रुपये आणि सरासरी १३०० रुपये, याच जिल्ह्यात चिंचवड कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३०० रुपये आणि सोलापूर जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १४०० रुपये दर मिळाला.
तसेच नंबर १ च्या कांद्याला अहिल्यानगर जिल्ह्यात कमीत कमी १३०० रुपये तर सरासरी १४५० रुपये तर नंबर ०२ च्या कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी ८५० रुपये तर नंबर ३ च्या कांद्याला कमीत कमी २०० रुपये तर सरासरी ३५० रुपयांपर्यंत असा दर मिळाला.
