Kanda Market : आज गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) दिवस. आजच्या दिवशी अनेक बाजारात कांद्याचे लिलाव बंद होते. काही निवडक बाजारात कांद्याची ६ हजार क्विंटल आवक झाली. आज लासलगाव-विंचूर बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १३७० रुपये दर मिळाला.
आज २७ ऑगस्ट रोजी कांद्याची ६ हजार १७५ क्विंटल आवक झाली. ही आवक सायंकाळी ०५ वाजेपर्यंत झाली. पुणे -पिंपरी बाजारात लोकल कांद्याला १४०० रुपये दर मिळाला. कर्जत (अहिल्यानगर) बाजारात सरासरी ९०० रुपये दर मिळाला.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १४०० रुपये दर मिळाला. तर अकोला बाजारात सर्वसाधारण कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १३०० रुपये दर मिळाला.
वाचा आजचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
27/08/2025 | ||||||
अकोला | --- | क्विंटल | 405 | 700 | 1700 | 1300 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 15 | 1300 | 1500 | 1400 |
कर्जत (अहमहदनगर) | लोकल | क्विंटल | 185 | 200 | 1500 | 900 |
मंगळवेढा | लोकल | क्विंटल | 68 | 100 | 1600 | 1400 |
लासलगाव - विंचूर | उन्हाळी | क्विंटल | 5502 | 600 | 1670 | 1370 |