Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : 'या' बाजारात कांद्याला उच्चांकी दर; अनेक बाजारात मात्र घसरण वाचा सविस्तर

Kanda Market : 'या' बाजारात कांद्याला उच्चांकी दर; अनेक बाजारात मात्र घसरण वाचा सविस्तर

latest news Kanda Market: Onion prices highest in 'this' market; however, prices fall in many markets Read in detail | Kanda Market : 'या' बाजारात कांद्याला उच्चांकी दर; अनेक बाजारात मात्र घसरण वाचा सविस्तर

Kanda Market : 'या' बाजारात कांद्याला उच्चांकी दर; अनेक बाजारात मात्र घसरण वाचा सविस्तर

Kanda Market : राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक (Kanda Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Kanda Market : राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक (Kanda Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Kanda Market :  राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शनिवारी (१६ मे) रोजी कांदाबाजारात मिश्र चित्र पाहायला मिळाले.(Kanda Arrivals) 

राज्यभरात एकूण सुमारे १ लाख ५६ हजार ९८ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असताना काही बाजार समित्यांमध्ये दरात तेजी दिसून आली, तर अनेक ठिकाणी जादा आवकेमुळे दर दबावात राहिल्याचे चित्र होते.(Kanda Arrivals)

राज्यातील सर्वाधिक कमाल दर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समिती येथे मिळाला. (Kanda Arrivals)

येथे उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल तब्बल २,०६० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर दुसरीकडे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर १०० ते २०० रुपयांपर्यंत खाली घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.(Kanda Arrivals)

पिंपळगाव बसवंतमध्ये सर्वाधिक आवक

राज्यातील सर्वाधिक कांदा आवक पिंपळगाव बसवंत बाजार समितीत झाली. येथे तब्बल ३३ हजार ४५१ क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली. 

मोठ्या आवकेनंतरही बाजारात मागणी टिकून राहिल्याने कमाल दर २,०६० रुपयांपर्यंत पोहोचले, तर सर्वसाधारण दर १,१५० रुपये राहिला.

अहिल्यानगर बाजार समितीत २४ हजार ५८४ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. मात्र जादा पुरवठ्यामुळे सर्वसाधारण दर केवळ ६५० रुपये राहिला.

लासलगावमध्ये दर टिकून

लासलगाव बाजार समिती येथे ६ हजार ५६६ क्विंटल आवक झाली. येथे कांद्याला ५०० ते १,५५१ रुपये दर मिळाला असून सर्वसाधारण दर १,०८० रुपये राहिला.

तर लासलगाव-विंचूर बाजारात ६ हजार ३५२ क्विंटल आवक झाली. येथे कमाल दर १,६०१ रुपयांपर्यंत पोहोचला तर सर्वसाधारण दर १,००० रुपये नोंदवला गेला.

सोलापूर, येवला आणि संगमनेरमध्ये दर दबावात

सोलापूर बाजार समिती येथे मोठ्या प्रमाणात १७ हजार ३७७ क्विंटल कांद्याची आवक झाली. मात्र वाढत्या पुरवठ्यामुळे दरात दबाव निर्माण झाला. येथे कांद्याला केवळ १०० ते १,७०० रुपये दर मिळाला असून सर्वसाधारण दर ७०० रुपये राहिला.

येवला बाजार समिती येथे ४ हजार क्विंटल आवक झाली. येथे कमाल दर १,२५१ रुपये असला तरी सर्वसाधारण दर ८०० रुपये राहिला.

संगमनेर बाजार समितीत ७ हजार ४७६ क्विंटल आवक झाली. येथे कांद्याला २०० ते १,३६१ रुपये दर मिळाला असून सरासरी दर ७८० रुपये राहिला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक (Kanda Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/05/2026
कोल्हापूर---क्विंटल620550016001000
अकोला---क्विंटल5853001200800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3726250800525
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल557130018001500
खेड-चाकण---क्विंटल325050012001000
कराडहालवाक्विंटल249100014001400
सोलापूरलालक्विंटल173771001700700
धुळेलालक्विंटल953300820600
नागपूरलालक्विंटल1050100014001300
हिंगणालालक्विंटल5120015001400
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल36940016001000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल33734001400900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1480012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल6455001000750
जामखेडलोकलक्विंटल7341001100600
वडगाव पेठलोकलक्विंटल31090014001100
वडूजलोकलक्विंटल1052001400800
मंगळवेढालोकलक्विंटल1762001210900
बारामती-जळोचीनं. १क्विंटल5452001000700
शेवगावनं. १क्विंटल1430600800700
शेवगावनं. २क्विंटल530300500425
शेवगावनं. ३क्विंटल1084100200175
हिंगणापांढराक्विंटल1160016001600
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल245841501150650
येवलाउन्हाळीक्विंटल40001001251800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल30002001190750
नाशिकउन्हाळीक्विंटल37703001251775
लासलगावउन्हाळीक्विंटल656650015511080
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल635250016011000
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल44541001200700
संगमनेरउन्हाळीक्विंटल74762001361780
कोपरगावउन्हाळीक्विंटल46203001300810
कोपरगावउन्हाळीक्विंटल40002501111775
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल83502001000700
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3345130020601150
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2170500905800
भुसावळउन्हाळीक्विंटल215001000800
रामटेकउन्हाळीक्विंटल11110013001200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर :Kanda Market :कांद्याची आवक किती; कुठे दर वाढले, कुठे कोसळले? वाचा सविस्तर

अधिक वाचा : Cotton Market : पांढरे सोने चमकले; मानवत बाजारात दराचा नवा विक्रम

Web Title : प्याज मंडी: कुछ मंडियों में उछाल, कई में गिरावट दर्ज।

Web Summary : महाराष्ट्र की मंडियों में प्याज की कीमतों में मिला-जुला रुख रहा। पिंपलगाँव बसवंत में कीमतें ₹2,060/क्विंटल तक बढ़ीं। सोलापुर जैसे अन्य बाजारों में अधिक आपूर्ति के कारण कीमतें गिरीं। आवक अच्छी रही, जिसका असर कीमतों पर अलग-अलग पड़ा।

Web Title : Onion Market: Prices surge in some markets, decline in others.

Web Summary : Onion prices show mixed trends across Maharashtra markets. Pimplegaon Baswant saw high prices, reaching ₹2,060/quintal. However, other markets like Solapur faced price drops due to high supply. Overall arrivals were substantial, impacting prices variably.