Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > महिनाभरात कांद्याच्या भावात ३० टक्क्यांची घसरण, आज सकाळ सत्रात काय भाव मिळाला?

महिनाभरात कांद्याच्या भावात ३० टक्क्यांची घसरण, आज सकाळ सत्रात काय भाव मिळाला?

Latest NEws kanda market Onion prices drop by 30 percent in a month in nashik kanda market | महिनाभरात कांद्याच्या भावात ३० टक्क्यांची घसरण, आज सकाळ सत्रात काय भाव मिळाला?

महिनाभरात कांद्याच्या भावात ३० टक्क्यांची घसरण, आज सकाळ सत्रात काय भाव मिळाला?

Kanda Market : बाजार समितीत गेल्या ३० दिवसात कांद्याच्या भावात ३० टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

Kanda Market : बाजार समितीत गेल्या ३० दिवसात कांद्याच्या भावात ३० टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

मनमाड : इराण इस्त्रायल-अमेरिका या युद्धाचा मोठा परिणाम जगभरातील सर्वच देशांवर झालेला दिसून येत आहे. भारतदेखील याला अपवाद नाही. देशातील बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झाला असून, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या ३० दिवसात कांद्याच्या भावात ३० टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

२८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर सात दिवसात कांद्याच्या किमान दरात वीस टक्के घसरण झाली आहे. युद्ध असेच सुरू राहिले तर ही घसरण पुढेदेखील चालू राहण्याची शक्यता आहे. एकीकडे मॉरिशसला एक लाख मेट्रिक टन कांदा पाठवला जाणार आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना गेल्या अनेक महिन्यापासून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

दि. ७ फेब्रुवारी रोजी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा किमान भाव २०० रुपये प्रतिक्विंटल तर कमाल भाव १३६१ रुपये प्रतिक्विंटल होता. सरासरी भाव ११५० रुपये इतका होता. 

शनिवारी (दि. ७) किमान भाव कमाल भाव १०७६ सरासरी भाव ८०० रुपये होता. २७ फेब्रुवारीला असलेला सरासरी भाव २८ फेब्रुवारी रोजी युद्धजन्य परिस्थितीमुळे २०० रुपयांनी उतरला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे कांदा निर्यातीस अडथळा आल्याने व देशांतर्गत उत्पादन वाढल्यामुळे भाव कोसळले आहेत.

 Kanda Bajar Bhav : लाल कांदा विकायचा का ठेवायचा, मार्च एण्डपर्यंत कांदा दर काय राहतील?

आजचे सकाळ सत्रातील दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/03/2026
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल41904001200800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1043480015001150
खेड-चाकण---क्विंटल1000070013001000
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल200001501180850
पुणेलोकलक्विंटल1316550015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10120016001400
कामठीलोकलक्विंटल3203025302280

Web Title : एक महीने में प्याज की कीमतों में 30% की गिरावट; आज के भाव।

Web Summary : युद्ध के कारण प्याज की कीमतों में गिरावट, मनमाड में 30% की गिरावट। निर्यात में बाधा, घरेलू उत्पादन में वृद्धि। आज के भाव: मुंबई 1150, पुणे 1000, कामठी 2280 (रु/क्विंटल)।

Web Title : Onion prices drop 30% in a month; morning rates here.

Web Summary : War impacts onion prices, dropping 30% in Manmad. Exports face hurdles, domestic production rises. Morning rates: Mumbai 1150, Pune 1000, Kamthi 2280 (Rs/Quintal).