Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : महिनाभरात सोलापूर, लासलगाव बाजारात कांदा 'इतक्या' रुपयांनी घसरले, वाचा सविस्तर 

Kanda Market : महिनाभरात सोलापूर, लासलगाव बाजारात कांदा 'इतक्या' रुपयांनी घसरले, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market Onion prices down in Solapur, Lasalgaon kanda markets in month, read in detail | Kanda Market : महिनाभरात सोलापूर, लासलगाव बाजारात कांदा 'इतक्या' रुपयांनी घसरले, वाचा सविस्तर 

Kanda Market : महिनाभरात सोलापूर, लासलगाव बाजारात कांदा 'इतक्या' रुपयांनी घसरले, वाचा सविस्तर 

Kanda Market : सोलापूर, लासलगाव बाजारात कांदा कवडीमोल (Lasalgaon kanda Market) भावात विकला जात आहे. भाव पडल्याने मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

Kanda Market : सोलापूर, लासलगाव बाजारात कांदा कवडीमोल (Lasalgaon kanda Market) भावात विकला जात आहे. भाव पडल्याने मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  गत चार ते पाच महिन्यांपासून कांद्याचे दर (Kanda Market) सारखे उसळी घेत आहेत. १२ नोव्हेंबर रोजी लाल कांद्याचे लिलाव ३८०० रुपये प्रतिक्विंटल असे झाले होते. यानंतर मात्र सातत्याने भाव खाली येत आहेत. दरम्यान, उन्हाळी कांद्याची आवक थांबली आहे. नवीन येणारा कांदा हा ओलसर आहे. गत महिनाभरापासून मंदी दिसून येत आहे. हे भाव ३८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल असे कोसळले आहेत. ६ रोजी गुरुवारी कांद्याचे लिलाव १७०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल असे पुकारले गेले. 

गेल्या काही दिवसांपासून लाल कांदा दरात (Lal Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच असून सोलापूर, लासलगाव बाजारात कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे. आवक वाढली असून भाव पडल्याने मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, उन्हाळ कांदा मार्चमध्ये बाजारात दाखल होणार आहे. सद्यःस्थितीत काही भागात कांदा लागवडही सुरू आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये लागवड झालेला लाल कांदा सद्यःस्थितीत कांदा मार्केटमध्ये (Kanda Market Yard) विक्रीस येत आहे.

दीड महिन्यांपूर्वी ३८०० रुपये प्रतिक्विंटल अशी तेजी अनुभवणाऱ्या 'लाल' कांद्याच्या भावात गुरुवारी मोठी घसरण झाली. हे दर गत पंधरा दिवसांच्या तुलनेत १३०० रुपये प्रतिक्विंटलने कोसळले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. गुरुवारी मार्केटमध्ये १६०० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर लासलगाव, सोलापूर बाजारात दिवाळी दरम्यान मिळणाऱ्या बाजारभावात कमालीची तफावत निर्माण झाली असून आता सोलापूर बाजारात १६०० रुपये ते १७०० रुपये, तर लासलगाव बाजारात १९०० रुपये ते २३०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. 


सप्टेंबरमध्ये सर्वोच्च दर

  • वर्षभरापासून कांदा उत्पादकांची परवड होत आहे. मध्यंतरी कांदा निर्यातीचा फटका शेतकऱ्यांना बसला. नंतर अवकाळी पाऊस व गारपिटीने कांदा उत्पादनावर परिणाम झाला होता.
  • सप्टेंबरमध्ये उन्हाळी कांद्याला ४१४१ रुपये प्रतिक्विंटल असे दर मिळाले होते. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो कांदा ७० रुपयांवर गेला होता.
  • मागील तीन महिन्यांपासून पावसाळी लाल कांद्याची आवक वाढल्याने दर काहीसे खाली आले. हे दर तीनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटलनेच कमी झाले होते.

Web Title: Latest News Kanda Market Onion prices down in Solapur, Lasalgaon kanda markets in month, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.