Kanda Market : आज २७ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. यामध्ये लासलगाव निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी १२०० रुपये तर लाल कांद्याला सरासरी १९०० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी १२५० रुपयांपर्यंत दर मिळाला.
त्याचबरोबर इतर बाजार समित्यांपैकी येवला बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी १ हजार रुपये, भुसावळ बाजारात ८०० रुपये तर लाल कांद्याला सोलापूर बाजार सरासरी ११०० रुपये, धुळे बाजारात १५०० रुपये, तर अमरावती फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये ०२ हजार रुपये दर मिळाला.
तसेच पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला १७०० रुपये, वडूज बाजारात १५०० रुपये मंगळवेढा बाजारात ९६० रुपये तर सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
