Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : वर्षभरात कांद्याचे दर किती टक्क्यांनी घसरले? वाचा सविस्तर 

Kanda Market : वर्षभरात कांद्याचे दर किती टक्क्यांनी घसरले? वाचा सविस्तर 

Latest News kanda market By how much percentage did onion prices fall in year Read in detail | Kanda Market : वर्षभरात कांद्याचे दर किती टक्क्यांनी घसरले? वाचा सविस्तर 

Kanda Market : वर्षभरात कांद्याचे दर किती टक्क्यांनी घसरले? वाचा सविस्तर 

Kanda Market : तीन महिन्यापासून दर जवळपास एकाच पातळीवर स्थिर आहेत. मात्र, वर्षभरात दर टक्क्यांनी कमी झाले आहेत.

Kanda Market : तीन महिन्यापासून दर जवळपास एकाच पातळीवर स्थिर आहेत. मात्र, वर्षभरात दर टक्क्यांनी कमी झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : सततच्या कांदा दरातील घसरणीमुळे (kanda Market Down) शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. एकीकडे सरकारचे धोरण, दुसरीकडे निर्यातीमध्ये असलेली संथगती, आयातदार देशांची असलेली उदासीनता दारावर परिणाम करीत आहेत. 

अशातच नाशिक जिल्ह्यात कांद्याचे (Nashik Kanda Market) उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. या जिल्ह्यातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. जगातील सर्व वस्तूंच्या किमती दरवर्षी वाढत असतानाच कांदा, टमाटा व भाजीपाला यांच्या दरामध्ये मात्र घसरण झाल्याचे दिसून येत आहे. 

नाशिक जिल्ह्यातील एकट्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दरांची माहिती घेतली असता ३० ऑगस्ट २०२४ रोजी कांद्याचा भाव ३,२५० रुपये प्रतिक्विंटल होता. ३० ऑगस्ट २५ रोजी १,३२० रुपये प्रतिक्विंटल इतका झाला आहे. म्हणजेच कांद्याच्या दरात वर्षभरात ६० टक्क्यांची घसरण झाली आहे.

दरम्यान ३० ऑगस्ट २०२४ रोजी कांद्याचा भाव ३,२५० रुपये प्रतिक्विंटल होता. ८ ऑक्टोबर रोजी उन्हाळ कांद्याला ३,९६० रुपये, तर लाल कांद्याला २,२९९ रुपये प्रतिक्विंटल भाव होता. १५ ऑक्टोबर रोजी उन्हाळ कांद्याला ३ हजार ९२० रुपये, लाल कांद्याला १,३०१ रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. ३० नोव्हेंबर रोजी लाल कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव होता. 

३१ जानेवारी २०२५ रोजी कांद्याचा दर २,१०० रुपयांपर्यंत खाली आला. ३१ मे २०२५ रोजी कांद्याचा दर १,३०० रुपये झाला आहे. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी कांद्याचे दर १,३२० रुपये प्रतिक्विंटल होते. म्हणजेच तीन महिने दर जवळपास एकाच पातळीवर स्थिर आहेत. मात्र, वर्षभराचा विचार करता दर ६० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

Web Title: Latest News kanda market By how much percentage did onion prices fall in year Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.