Join us

Kanda Bajar Bhav : मेच्या शेवटी लासलगाव कांदा मार्केटमध्ये काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:55 IST

Kanda Bajar Bhav : आज 26 मे रोजी लासलगावसह सोलापूर कांदा बाजारात काय स्थिती आहे, ते पाहुयात..

Kanda Bajar Bhav : मे च्या शेवटच्या आठवड्यात कांद्याच्या दरात थोडीफार सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळते आहे. मागील दोन दिवसांपासून सोलापूर (Solapur Kanda Market) आणि लासलगाव बाजारात लाल आणि उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) काहीसा समाधानकारक मिळत असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात राज्यातील बाजार समितीमध्ये दीड लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. 

आज उन्हाळ कांद्याला (Lasalgaon Kanda Market) लासलगाव बाजारात कमीत कमी 600 आणि सरासरी 1200 रुपये दर मिळाला (आज दुपारपर्यंत). तर येवला बाजारात सरासरी 950 रुपये, कळवण बाजारात 1111 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1400 रुपये, गंगापूर बाजारात 1150 रुपये तर देवळा बाजारात 1225 रुपये दर मिळाला.

तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात सरासरी 1250 रुपये, कुर्डूवाडी मोडनिंब बाजारात 900 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1200 रुपये दर मिळाला. तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी 1400 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/05/2025
कोल्हापूर---क्विंटल163950019001200
अकोला---क्विंटल46150013001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19225001200850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल83100015001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11729100018001400
कराडहालवाक्विंटल1850017001700
सोलापूरलालक्विंटल1181910021001300
नागपूरलालक्विंटल210080014001250
कुर्डवाडी-मोडनिंबलालक्विंटल951001351900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल5105001300900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल108150019001200
पुणेलोकलक्विंटल627460018001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल2254001500950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल180070014001150
मंगळवेढालोकलक्विंटल4520015501370
बारामती-जळोचीनं. १क्विंटल1293001300800
शेवगावनं. १क्विंटल308120018001400
कल्याणनं. १क्विंटल3160018001700
शेवगावनं. २क्विंटल2807001100900
शेवगावनं. ३क्विंटल408200600450
नागपूरपांढराक्विंटल210060012001050
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल886525017001150
येवलाउन्हाळीक्विंटल70001001421950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500010014501000
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल580050016001180
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल110002001477870
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल55520014001200
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल231010018001000
कळवणउन्हाळीक्विंटल1735050019251111
चांदवडउन्हाळीक्विंटल600030015611100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3000055021761400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल175165014141050
गंगापूरउन्हाळीक्विंटल220340015201150
देवळाउन्हाळीक्विंटल148510014051225

 

टॅग्स :कांदामार्केट यार्डकृषी योजनाशेतीसोलापूरनाशिक