Lokmat Agro >बाजारहाट > Nafed Kanda Kharedi : अखेर नाफेड कांदा खरेदी सुरु, पहा नाशिक जिल्ह्यातील सोसायट्यांची यादी 

Nafed Kanda Kharedi : अखेर नाफेड कांदा खरेदी सुरु, पहा नाशिक जिल्ह्यातील सोसायट्यांची यादी 

Latest news Finally Nafed onion procurement has started, see the list of societies in Nashik district | Nafed Kanda Kharedi : अखेर नाफेड कांदा खरेदी सुरु, पहा नाशिक जिल्ह्यातील सोसायट्यांची यादी 

Nafed Kanda Kharedi : अखेर नाफेड कांदा खरेदी सुरु, पहा नाशिक जिल्ह्यातील सोसायट्यांची यादी 

Nafed Kanda Kharedi : नाफेडने (NAFED) निर्धारित मापदंडानुसार पीएसएफ रब्बी 2025 अंतर्गत कांद्याची खरेदी सुरू केली आहे.

Nafed Kanda Kharedi : नाफेडने (NAFED) निर्धारित मापदंडानुसार पीएसएफ रब्बी 2025 अंतर्गत कांद्याची खरेदी सुरू केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Nafed Kanda Kharedi : अखेर नाफेडची कांदा खरेदी (Kanda Kharedi) सुरू झाली असून जवळपास बारा सोसायट्यांना यात सहभागी करून घेण्यात आला आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून शेतकरी नाफेडच्या कांदा खरेदीच्या प्रतीक्षेत होते. अखेर या खरेदीला  जुलैचा मुहूर्त सापडला आहे. 

नाफेडने (NAFED) निर्धारित मापदंडानुसार पीएसएफ रब्बी 2025 अंतर्गत कांद्याची खरेदी सुरू केली आहे. जे शेतकरी त्यांचा कांदा नाफेडला देण्यास इच्छुक आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी नाफेडणे सोसायटींची यादी जाहीर केली असून त्या परिसरातील शेतकऱ्यांनी थेट सोसायटीची संपर्क साधून कांदा विक्री करता येणार आहे. 

    हेही वाचा : नाफेड नाव नोंदणी कशी करावी, इथे वाचा सविस्तर

तत्पुर्वी नाफेडला कांदा देण्यासाठी शेतकऱ्यांना ई प्रवाह या नाफेडच्या वेबसाईटवर नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कांदा विक्री करण्यापूर्वी या पोर्टलला भेट देऊन शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करायची आहे. 

अशी आहे सोसायट्यांची यादी

  1. आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, पुणे 
  2. बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित, पिंपळगाव
  3. चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित, चांदवड
  4. देवी अहिल्या फळबाग खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित. उमराणे 
  5. इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, मेशी देवळा 
  6. कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ मर्यादित, पिंपळगाव 
  7. कृषी साधना महिला सहकारी फळे भाजीपाला आणि खरेदी विक्री संस्था मर्यादित, विंचूर 
  8. ओमकार बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित, विंचूर 
  9. शरद अटल नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित, हिवरगाव 
  10. शेतकरी सहकारी संघ कळवण देवळा, द सप्तश्री फार्मर्स प्रोडूसर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, चांदवड

 

या जवळपास 12 सोसायटी असून केवळ पुणे जिल्ह्यातील एका सोसायटीचा समावेश असून इतर सोसायटी या नाशिक जिल्ह्यातील आहेत. 

Web Title: Latest news Finally Nafed onion procurement has started, see the list of societies in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.