Lokmat Agro >बाजारहाट > Dalimb Market : मराठवाड्यातील डाळिंब शेतकऱ्यांसाठी नवी उमेद; करमाडची 'ग्रेड' बाजारपेठ तयार वाचा सविस्तर

Dalimb Market : मराठवाड्यातील डाळिंब शेतकऱ्यांसाठी नवी उमेद; करमाडची 'ग्रेड' बाजारपेठ तयार वाचा सविस्तर

latest news Dalimb Market: New hope for pomegranate farmers in Marathwada; Karmad's 'grade' market ready Read in detail | Dalimb Market : मराठवाड्यातील डाळिंब शेतकऱ्यांसाठी नवी उमेद; करमाडची 'ग्रेड' बाजारपेठ तयार वाचा सविस्तर

Dalimb Market : मराठवाड्यातील डाळिंब शेतकऱ्यांसाठी नवी उमेद; करमाडची 'ग्रेड' बाजारपेठ तयार वाचा सविस्तर

Dalimb Market : नाशिकच्या डाळिंब मक्तेदारीला शह देत करमाडने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांचा सहभाग, ५०० टनांची रोजची खरेदी क्षमता, जागतिक दर्जाचं ग्रेडिंग मशीन आणि तत्काळ पेमेंटची सुविधा यामुळे मराठवाड्यातील डाळिंब शेतकऱ्यांसाठी करमाड हे नवं आशेचं किरण बनलं आहे. (Marathwada Dalimb Market)

Dalimb Market : नाशिकच्या डाळिंब मक्तेदारीला शह देत करमाडने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांचा सहभाग, ५०० टनांची रोजची खरेदी क्षमता, जागतिक दर्जाचं ग्रेडिंग मशीन आणि तत्काळ पेमेंटची सुविधा यामुळे मराठवाड्यातील डाळिंब शेतकऱ्यांसाठी करमाड हे नवं आशेचं किरण बनलं आहे. (Marathwada Dalimb Market)

शेअर :

Join us
Join usNext

प्रशांत तेलवाडकर

नाशिकच्या पारंपरिक डाळिंबबाजारपेठेला सशक्त पर्याय देत करमाड उपबाजार समिती डाळिंब खरेदी-विक्रीचे नवे शक्तिकेंद्र ठरू लागली आहे.(Marathwada Dalimb Market)

नाशिकच्या डाळिंब मक्तेदारीला शह देत करमाडने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांचा सहभाग, ५०० टनांची रोजची खरेदी क्षमता, जागतिक दर्जाचं ग्रेडिंग मशीन आणि तत्काळ पेमेंटची सुविधा यामुळे मराठवाड्यातील डाळिंब शेतकऱ्यांसाठी करमाड हे नवं आशेचं किरण बनलं आहे.(Marathwada Dalimb Market)

दररोज तब्बल ५०० टन डाळिंब खरेदी करण्याची क्षमता इथे निर्माण झाली असून, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरत आहे.(Marathwada Dalimb Market)

डाळिंब खरेदीचे 'पॉवर हब' जाधववाडी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने करमाड उपबाजार समितीत उभी केली आहे. येथे नुकतेच चालू हंगामातील डाळिंब लिलावास सुरुवात झाली आहे.(Marathwada Dalimb Market)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दिशेने करमाडचा टप्पा

सध्या येथे दोन तगडे अडत व्यापारी नोंदणीकृत आहेत. दररोज ५०० टनांपर्यंत खरेदीची त्यांची क्षमता असून, यात एक स्थानिक, तर दुसरे गुजरातमधील सर्वांत मोठा अडत व्यापारी आहे. त्यांना दुबई, श्रीलंका, नेपाळ यासारख्या देशांमध्ये डाळिंब निर्यातीचा दीर्घ अनुभव आहे.

शेतकऱ्यांच्या हाती व्यवहारानंतर त्वरित रक्कम

यापूर्वी शेतकऱ्यांना डाळिंब विक्रीसाठी नाशिकचा प्रवास करावा लागत होता. वेळ, वाहतूक खर्च आणि अनिश्चित दर यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना करमाडमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. येथे लिलाव होताच व्यवहार पूर्ण होतो आणि संपूर्ण रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.

५० लाख किमतीची ग्रेडिंग मशीन आल्याने डाळिंबाचा दर्जा निश्चित होईल. अधिकाधिक दर्जेदार उत्पादनासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

मराठवाड्यातील डाळिंब चवीत नंबर वन

देशात डाळिंब उत्पादनात राजस्थान नंबर वन बनला आहे. मात्र, मराठवाड्यातील डाळिंब चव आणि टिकाऊपणात सर्वोत्तम आहे. यासाठी आम्ही येथे ५० लाखांचे ग्रेडिंग मशीन बसवले असून, संपूर्ण प्रक्रिया याच ठिकाणी होते. स्पर्धा वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. - रणजीतसिंह चौधरी, अडत व्यापारी

उत्पादन दुपटीने वाढणार

यंदा मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट उत्पादन अपेक्षित आहे. सध्या रोज २ ते ३ टन आवक होत असून, १५ जुलैनंतर ही संख्या झपाट्याने वाढून सप्टेंबरपर्यंत शिखर गाठेल. जिल्ह्यातील शेतकरी आता करमाडला प्राधान्य देत आहेत. - भरत सोनवणे, अडत व्यापारी

शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण

करमाडमध्ये डाळिंब खरेदी केली जात आहे व लगेच पेमेंट होत असल्याने ही उपबाजार समिती शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरत आहे. - सुभाष भोसले, डाळिंब उत्पादक

नाशिक मार्केटला पर्याय

डाळिंब व्यवसायात नाशिकला टक्कर देण्यासाठी करमाड सक्षम होत आहे. शेतकऱ्यांचा विश्वास, व्यापाऱ्यांची उपस्थिती आणि आंतरराष्ट्रीय व्याप्तीमुळे करमाडची वाटचाल समृद्ध बाजारपेठेच्या दिशेने सुरू आहे. - राधाकिसन पठाडे, सभापती, कृउबा समिती

हे ही वाचा सविस्तर : Banana Export : केळीचा गोडवा वाढला; युद्धविरामानंतर दरात दुपटीने वाढ वाचा सविस्तर

Web Title: latest news Dalimb Market: New hope for pomegranate farmers in Marathwada; Karmad's 'grade' market ready Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.