Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Chia Seed Market : हळदनंतर आता चियाची एंट्री; बाजारात पहिल्याच दिवशी जबदरदस्त दर

Chia Seed Market : हळदनंतर आता चियाची एंट्री; बाजारात पहिल्याच दिवशी जबदरदस्त दर

latest news Chia Seed Market: Chia entry after turmeric; A great price on the first day in the market | Chia Seed Market : हळदनंतर आता चियाची एंट्री; बाजारात पहिल्याच दिवशी जबदरदस्त दर

Chia Seed Market : हळदनंतर आता चियाची एंट्री; बाजारात पहिल्याच दिवशी जबदरदस्त दर

Chia Seed Market : रिसोड बाजार समितीत चिया खरेदीस सुरुवात होताच पहिल्याच दिवशी मोठी आवक नोंदवली गेली आहे. चियाला प्रतिक्विंटल चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पर्यायी पिक म्हणून चिया आता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार का? जाणून घ्या सविस्तर…(Chia Seed Market)

Chia Seed Market : रिसोड बाजार समितीत चिया खरेदीस सुरुवात होताच पहिल्याच दिवशी मोठी आवक नोंदवली गेली आहे. चियाला प्रतिक्विंटल चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पर्यायी पिक म्हणून चिया आता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार का? जाणून घ्या सविस्तर…(Chia Seed Market)

रिसोड : पर्यायी आणि नाविन्यपूर्ण पीक म्हणून ओळख मिळवत असलेल्या चियाच्या खरेदीस रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिकृत सुरुवात झाली आहे. (Chia Seed Market)

बुधवारी (२५ फेब्रुवारी) चिया विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. (Chia Seed Market)

पहिल्याच दिवशी तब्बल १५० क्विंटल चियाची आवक झाली असून चियाला प्रतिक्विंटल १६ हजार २५० रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Chia Seed Market)

रिसोड व परिसरातील शेतकरी पर्यायी पीक म्हणून चियाकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत.

या पिकाची लागवड वाढावी यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत शेतकऱ्यांना अल्प दरात चिया बियाणे उपलब्ध करून दिले होते.

या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक चियाचा पेरा रिसोड तालुक्यात झाल्याचे सांगितले जाते.

चिया उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीची स्थिर आणि खात्रीशीर बाजारपेठ मिळावी, यासाठी समितीकडून गेल्या वर्षापासून खरेदी-विक्री प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यंदा चियाचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता असल्याने नियमित बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर समितीचा भर आहे.

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती हळद खरेदी-विक्रीसाठी देशभरात ओळखली जाते. हळदीची मोठी आवक सुरू होईपर्यंत दर बुधवारी चिया विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना ठराविक दिवशी आपला माल विक्रीस आणणे सोपे होणार आहे.

या शुभारंभ प्रसंगी समितीचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने चिया उत्पादक शेतकरी उपस्थित होते. विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

चियाला मिळालेल्या चांगल्या दरामुळे आणि उपलब्ध बाजारपेठेमुळे येत्या काळात या पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Chia Seed Market : बाजारात नवे ट्रेंड; चिया-आळीवला विक्रमी बाजारभाव वाचा सविस्तर

अधिक वाचा : Chia Seeds Farming : चार महिन्यांत उत्पन्न हाती; चिया सीड्स बनतंय शाश्वत शेतीचा गेमचेंजर वाचा सविस्तर

Web Title : रिसोड में चिया बीज बाजार में उछाल: किसानों को मिल रहे हैं ऊंचे दाम

Web Summary : रिसोड कृषि उत्पन्न बाजार समिति में चिया बीज की बिक्री की मजबूत शुरुआत हुई, कीमतें ₹16,250/क्विंटल तक पहुंचीं। किसान चिया को वैकल्पिक फसल के रूप में अपना रहे हैं, बाजार समिति द्वारा किफायती बीज उपलब्ध कराने की पहल का समर्थन किया जा रहा है। समिति का लक्ष्य चिया उत्पादकों के लिए एक स्थिर बाजार प्रदान करना है, साप्ताहिक बिक्री की योजना है।

Web Title : Chia Seed Market Booms in Risod: Farmers Reap High Prices

Web Summary : Risod APMC sees a strong start to chia seed sales, with prices reaching ₹16,250/quintal. Farmers are shifting to chia as an alternative crop, supported by the market committee's initiative to provide affordable seeds. The committee aims to provide a stable market for chia growers, planning weekly sales.