गोंदिया : लगतच्या छत्तीसगड राज्यात तेथील शासनाने धानाला प्रतिक्विंटल ३१०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, याचा फायदा हा इतर राज्यातील व्यापाऱ्यांनी घेऊ नये यासाठी इतर राज्यातील धान छत्तीसगडमध्ये या दरम्यान विक्रीसाठी येऊ नये यासाठी तेथील सरकारने आदेश काढला आहे.
इतर राज्यातून धान येथे विक्रीसाठी येताना आढळल्यास ते ट्रक जप्त करण्याचे, सीमा तपासणी नाक्यावर कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातील ट्रकसुद्धा महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या चिचोला बॉर्डरवरून परत येत आहे.
दरवर्षी खरीप हंगामात महाराष्ट्रसह तसेच इतर राज्यातील व्यापारी धानाची कमी दराने विक्री करून तो पाठवितात. धान छत्तीसगड राज्यात विक्रीसाठी महाराष्ट्रातून दररोज शंभर ट्रकवर धान येथे पाठविला जात होता. यामुळे मूळ छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळत नव्हता. त्यातच यंदा छत्तीसगड सरकारने खरीप हंगामातील धानाला प्रतिक्विंटल ३१०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे.
मात्र, याचा लाभ छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांना मिळावा, शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये यासाठी यंदा प्रथमच येथील सरकारने इतर राज्यातील धान खरीप हंगामातील धान खरेदीदरम्यान येऊ नये आहे. तसेच या दरम्यान बाहेर राज्यातील धान येऊ नये यासाठी छत्तीसगडच्या सीमा तपासणी नाक्यावरूनच परत पाठविण्याचे निर्देश दिले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र-छत्तीसगडच्या चिचोला बॉर्डरवरून धानाचे ट्रक परत येत आहे. याचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील व्यापाऱ्यांना बसत आहे. या भागातील व्यापारी कमी दराने न तो धान राज्यात पाठवितात यासाठी आदेश काढला. व्यापारी खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून दोन हजार प्रतिक्विंटल प्रमाणे धानाची खरेदी करून तो धान छत्तीसगड राज्यात विक्रीसाठी पाठवित होते. या व्यापाऱ्यांना प्रतिक्विंटल ८०० ते ९०० रुपयांचा नफा मिळत होता. त्यामुळे दररोज शंभर ट्रकवर धान या भागातून छत्तीसगडमध्ये जात असल्याची माहिती आहे.
छुप्या मार्गाने धान नेणे व्यापाऱ्यांना भोवले
पूर्व विदर्भातील काही व्यापाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यातील चिचगड जंगलातून छत्तीसगड राज्यात जाणाऱ्या मार्गावरून धानाचे ट्रक नेले. पण, याची माहिती मिळताच ते थानाचे ट्रक छत्तीसगड सरकारने जप्त केले आहे. यामुळे संबंधित व्यापारी चांगलेच अडचणीत आले असून हे ट्रक सोडविण्यासाठी आता त्यांची धडपड सुरू आहे.
खरीदेचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर पाठविता येणार व्यापाऱ्यांना धान
खरीप हंगामातील धान खरेदीचे छत्तीसगड सरकारचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर इतर राज्यातील धान येण्यावर लावले निर्बंध हटविण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यातील व्यापाऱ्यांना छत्तीसगडमध्ये धानाची विक्री करता येणार असल्याची माहिती आहे.
