Kanda Niryat : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून बांगलादेश सरकारने आयातीसाठी परवाने वाढवले आहेत. त्यानुसार सुरुवातीला ५० आयपीने आयातीला परवानगी दिल्यानंतर आता २०० परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतातून कांद्याचे निर्यात वाढण्यास मदत होणार आहे.
एकीकडे बांग्लादेशने काही दिवसांपूर्वी भारतीय कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला. यानंतर १५०० टनांपर्यंत आयात सुरु झाली. त्यामुळे निर्यातीला चालना मिळण्यास सुरवात झाली. शिवाय देशांतर्गत आणि स्थानिक मार्केटमध्येही कांद्याचे दर बदलत आहेत. आता पुन्हा बांग्लादेशने आयातीचे परवाने वाढवले असून यात २०० आयात परवाने दिले जाणार आहेत.
बांग्लादेश सरकार स्थानिक कांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी, १३ डिसेंबर म्हणजेच आजपासून दररोज २०० आयात परवाने (IP) जारी करणार आहे. आज येथे मिळालेल्या पीआयडीच्या माहितीपत्रकानुसार, प्रत्येक परवान्याद्वारे पूर्वीप्रमाणेच ३० टनपर्यंत कांद्याची आयात करता येईल. यामुळे भारतातही कांद्याला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षा आहेत
दरम्यान यापूर्वी सादर केलेले अर्ज वैध राहतील, म्हणजेच १ ऑगस्ट २०२५ पासून परवान्यांसाठी अर्ज केलेले आयातदारच पुन्हा अर्ज करू शकतील. प्रत्येक आयातदार एका वेळी एकच अर्ज सादर करू शकतो. कृषी मंत्रालयाने सांगितले की, कांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी ही प्रक्रिया पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहील.
भाव वाढतील, पण...
एकीकडे बांग्लादेशच्या निर्णयाने कांद्याच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी चाळीतला कांदाही विक्री केल्याने विक्रीसाठी कांदाच शिल्लक नसल्याचे माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे. ज्यांच्याकडे काही प्रमाणात कांदा शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांना थोड्या फार प्रमाणात का होईना, दर मिळतील. अशी आशा आहे.
Kanda Bajarbhav : सोलापूर, लासलगाव, पिंपळगाव मार्केटमध्ये दर बदलले, वाचा आजचे कांदा बाजारभाव
