Lokmat Agro >बाजारहाट > जळगावहून इराणला केळी एक्स्पोर्ट केली, बांधावरूनच प्रतिक्विंटल 'इतका' दर मिळाला

जळगावहून इराणला केळी एक्स्पोर्ट केली, बांधावरूनच प्रतिक्विंटल 'इतका' दर मिळाला

Latest News banana Export Bananas were exported to Iran from Jalgaon by boat | जळगावहून इराणला केळी एक्स्पोर्ट केली, बांधावरूनच प्रतिक्विंटल 'इतका' दर मिळाला

जळगावहून इराणला केळी एक्स्पोर्ट केली, बांधावरूनच प्रतिक्विंटल 'इतका' दर मिळाला

Banana Export : या केळीची इराणमध्ये मागणी वाढली असून, केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.

Banana Export : या केळीची इराणमध्ये मागणी वाढली असून, केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव : मुदखेड तालुक्यातील पांढरवाडी येथील शेतकरी आनंदराव गादीलवाड यांनी शेतात आधुनिक पद्धतीने केळी बागांची लागवड (Banana Farming) केली आहे. त्यांच्या केळी पिकाला थेट बांधावरूनच १ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

या केळीची इराणमध्ये (Banana Export To Iran) मागणी वाढली असून, केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.

गादीलवाड यांनी त्यांच्या तीन एकर जमिनीमध्ये चार हजार केळीची लागवड केली आहे. यासाठी बेड पद्धतीवर सहा बाय पाच अंतरावर केली आहे. जिद्द व मेहनतीच्या जोरावर या वर्षात केळीच्या बाग एक्सपोर्ट कसा होईल? ही चिकाटी मनात धरून त्या पद्धतीने केळी बागांचे नियोजन केले. 

केळी पिकास ठिबक सिंचनाद्वारे पाणी नियोजन करून ड्रीपच्या साह्याने खताचे डोस देण्यात आले, तर केळी घडावर चमक व रोगराईपासून बचावासाठी किडीनाशक फवारण्या केल्या. योग्य पद्धतीने नियोजन करून दहा महिन्याच्या कालावधीत २२ किलो वजनापर्यंत केळी घड तयार करण्यास यश मिळवले आहे. 

योग्य नियोजन केल्याने त्यांनी प्रति एकर पाच लाखांचे उत्पादन मिळविले आहे. थेट बांधावरून केळी घडाची छाटणी करून बॉक्स पॅकिंग नियोजन करून विदेशात व्यापारी बोटिंगने पोहोचती करण्यात येत आहे. चमकदार केळी घड केळाची साइज योग्यरीत्या झाल्याचे ते म्हणाले.

योग्य नियोजनामुळे एक्सपोर्टसाठी मागणी वाढली
शिवारातील केळी विदेशात जात असून, बाजारात इतर फळे कमी झाल्याने दहा देशात केळीची मागणी वाढली आहे. केळी दर पुढे चारशे रुपये प्रतिक्विंटल वाढतील, अशी माहिती केळी व्यापारी नीलेशराव देशमुख यांनी दिली.

पांढरवाडी येथील शेतकऱ्यांनी केळी बागांचे नियोजन योग्य पद्धतीने केले असल्याने केळी पीक जोमात आले. एक्स्पोर्टसाठी मागणी वाढली असून, केळी विदेशात जात असल्याचे शेतकरी राम गवंडेवाड यांनी सांगितले.

Web Title: Latest News banana Export Bananas were exported to Iran from Jalgaon by boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.