सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची आवक घटली होती तर कांद्याच्या भावात ही कमालीची घसरण झाली होती. त्यामुळे चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार ते किमान ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
गेल्या आठवड्यात शनिवार, रविवार आणि सोमवारी प्रजासत्ताक दिन अशा सलग तीन सुट्ट्या आल्या होत्या त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी कांदाबाजारात तेजी येईल अशी परिस्थिती होती.
मात्र, मंगळवारी ६०४ तर बुधवारी ४८७ ट्रक कांद्याची आवक झाली होती तर बाजार भावात ही फारसा फरक पडला नाही. त्यामुळे गुरुवारी तरी कांदा बाजार उसळी घेईल असे शेतकऱ्यांना वाटत होते.
त्यामुळे ५३६ ट्रक कांद्याची आवक झाली होती. मात्र, बाजारभाव सर्वसाधारणच राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.
मार्केट बंद की चालू संभ्रमावस्था..
◼️ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघातील निधन झाले होते.
◼️ त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तीन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता.
◼️ त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजार सुरू राहणार की बंद हे समजत नव्हते.
◼️ याविषयी व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती त्यांचा परिणाम गुरुवारी कांदा बाजारात दिसून आल्याची चर्चा होती.
अधिक वाचा: शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद आता मिटणार; सुरु होतोय 'हा' पथदर्शी प्रकल्प
Web Summary : Solapur's onion market saw reduced arrivals and price drops after consecutive holidays. Despite expectations, prices remained low, disappointing farmers. Confusion regarding market operations due to a state mourning period further impacted trading.
Web Summary : लगातार छुट्टियों के बाद सोलापुर के प्याज बाजार में आवक कम हुई और कीमतें गिरीं। उम्मीदों के बावजूद, कीमतें कम रहीं, जिससे किसान निराश हुए। राजकीय शोक के कारण बाजार संचालन को लेकर भ्रम से व्यापार पर और असर पड़ा।