लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी शेतमालाची मोठी आवक पाहायला मिळाली. विशेषतः सोयाबीन आणि गुळाच्या दरांकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सोयाबीनला ४,९०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला असून, बाजारपेठेत एकूण ८,१८१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
मंगळवारी निघालेल्या बाजारभावामध्ये कडधान्ये आणि तृणधान्यांच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. प्रमुख शेतमालाचे दर पुढीलप्रमाणे राहिले आहेत. सोयाबीन ८,१८१ क्विंटलची विक्रमी आवक झाली असून, सर्वसाधारण भाव ४,९०० रुपये राहिला. गुळाची आवक ५१८ क्विंटल राहिली, तर कमाल दर ४,४५० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला.
तुरीची ७८५ क्विंटल आवक झाली असून, कमाल भाव ७६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हरभऱ्याला ५,२५१ रुपयांचा कमाल दर मिळाला, मुगाची आवक १८५ क्विंटल असून कमाल भाव ७,२०० रुपये राहिला, तर उडदाला ६,६०० रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला.
तृणधान्यांची स्थिती..!
• गहू आणि ज्वारीच्या दरातही स्थिरता पाहायला मिळाली. गव्हाची १२९ क्विंटल आवक होऊन ३,६०० रुपये कमाल भाव मिळाला. रब्बी ज्वारीला ३,४८५ रुपये तर पिवळ्या ज्वारीला ४,४५० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे.
• बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असून, शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
