शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसेल तर लागवड करायची की नाही, असा प्रश्न अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
गतवर्षी ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव कापसाला मिळाला होता; परंतु यावर्षी ७ हजार प्रतिक्विंटलच दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत आहे.
गतवर्षी ८ हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाला भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाव मिळेल, या आशेवर पावसाचे प्रमाण कमी राहिले तरी कापसाची लागवड केली; परंतु सुरुवातीपासून बाजारात कापसाचा दर कमी आहे. त्यात लागवडीचा खर्चही वाढला आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कापसामध्ये त्रुटी काढून त्यास भाव देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होऊन बसले आहे. शेतीमालाला योग्य भाव द्यावा, ही अपेक्षा आहे. - गणेश शेगोकार, शेतकरी.
खेडा खरेदी ७ हजारांचा मिळतोय भाव
• एकीकडे कापसाचा उतारा कमी आणि गतवर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला ८००० हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता; परंतु यावर्षी खेडा खरेदीत कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार रुपयेच भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
• यावर्षीपेक्षा गतवर्षी बरा पाऊस झाला. त्यामुळे कापसाची लागवडही बऱ्यापैकी होती. एकरी ३ ते ४ क्विंटलच उतारा लागला त्यात भावही मिळत नसल्याने शेती करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे
कापसाला ८ हजार रुपये भाव मिळाला होता. परंतु, यावर्षी ७ हजारांच्या पुढे भाव जात नाही. महागाईच्या काळात शेतकऱ्यांनी करावे तरी काय, असा प्रश्न आहे. शेती करणे कठीण होऊन बसले आहे. - गोपाल वडतकार, शेतकरी.
राज्यातील सोमवार (दि.०६) जानेवारी रोजीचे कापूस दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
06/01/2025 | ||||||
अमरावती | --- | क्विंटल | 90 | 7200 | 7525 | 7362 |
सावनेर | --- | क्विंटल | 4500 | 7050 | 7125 | 7100 |
किनवट | --- | क्विंटल | 53 | 6900 | 7000 | 6950 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 699 | 7000 | 7140 | 7050 |
काटोल | लोकल | क्विंटल | 254 | 6900 | 7200 | 7050 |
बार्शी - टाकळी | मध्यम स्टेपल | क्विंटल | 9000 | 7421 | 7421 | 7421 |
पुलगाव | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1850 | 6900 | 7351 | 7150 |
(सौजन्य : कृषि पणन महामंडळ महाराष्ट्र राज्य.).