चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये तरकारी मालासह रताळी, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांद्याची प्रचंड आवक झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १०० क्विंटलने वाढली, तरी कांद्याच्या भावात २०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव १,५०० वरून १,७०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला.
याशिवाय, बटाट्याची आवक १,२५० क्विंटल झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत २५० क्विंटलने कमी आहे. यामुळे बटाट्याच्या भावातही २०० रुपयांची वाढ होऊन कमाल भाव १,८०० वरून २,००० रुपये प्रति क्विंटल झाला. लसणाची आवक ३५ क्विंटल झाली.
शेतीमालाची आवक आणि बाजारभाव
कांदा
आवक : १,००० क्विंटल.
भाव १) १,७०० रुपये (कमाल)
भाव २) १,३०० रुपये.
भाव ३) १,००० रुपये.
बटाटा
आवक : १,२५० क्विंटल.
भाव १) २,००० रुपये (कमाल)
भाव २) १,६०० रुपये.
भाव ३) १,२०० रुपये.
अधिक वाचा: Ranbhaji Mahotsav : पौष्टिक भाज्यांबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी रानभाजी महोत्सव