rahata kanda bajar bhav अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला समाधानकारक दर मिळाले.
राहाता बाजार समितीत रविवारी (दि.०२) नोव्हेंबर रोजी कांद्याची एकूण ७८७० गोण्या आवक झाली होती.
कांदा लिलावात गोणीतील कांद्याला कमाल २४०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला.
१ नंबर कांद्याला १७०० ते २४०० रुपये
२ नंबर कांद्याला ११०० ते १६५० रुपये
३ नंबर कांद्याला ५०० ते १०५० रुपये असा सरासरी दर मिळाला.
दरम्यान गोल्टी कांद्याला ७०० ते १३०० रुपये, जोड कांद्याला ३०० ते ६०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला.
काही अंशी मिळालेल्या या दर वाढीमुळे शेतकऱ्यांत तात्पुरते समाधान दिसून येत असले तरी बाजारात आवक वाढल्यास पुन्हा दरात चढउतार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा: लाईट बिलावरील नावातील बदल दुरुस्ती होणार आता ७ दिवसांच्या आत; अर्जांना स्वयंचलित मंजुरी
